अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठकीत ग्रीनलँडसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. "ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका लष्करी बळाचा वापर करणार नाही," असे डोनाल्ट ट्रम्प यांनी म्हटेला आहे. याशिवाय, या खनिजसंपन्न बेटाचे संरक्षण केवळ अमेरिकाच करू शकते, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
ट्रम्प म्हणाले, अनेकांना वाटले होते की, मी बळाचा वापर करेन, मात्र मला त्याची गरज नाही. मी ते करणारही नाही. आपण 'हो'ही म्हणू शकता अथवा 'नाही'ही म्हणू शकता. पण आम्ही हे लक्षात ठेवू. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ग्रीनलँड वाचवले आणि डेन्मार्कच्या स्वाधीन केले होते, तेव्हा अमेरिका महासत्ता होती. आता अमेरिका त्यापेक्षाही अधिक शक्तिशाली झाली आहे."आपल्या ७० मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी युरोपच्या आर्थिक स्थितीसंदर्भातही भाष्य केले. अमेरिकेत आर्थिक प्रगती होत आहे. तर युरोप चुकीच्या दिशेने जात आहे. असे ट्रम्प म्हणाले. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश असून तो अमेरिका, रशिया आणि चीन दरम्यान एका मोक्याच्या ठिकाणी आहे. अमेरिकेला ग्रीनलँड दुर्मिळ खनिजांसाठी नको, तर धोरणात्मक कारणांसाठी हवा आहे.
ग्रीनलँडसंदर्भात आपला दावा मांडताना ट्रम्प म्हणाले, "आम्ही सुंदर डेन्मार्कसाठी लढलो. तो जमिन नाही तर हिमनगाचा एक मोठा तुकडा आहे, जो थंड आणि दुर्गम ठिकाणी आहे. आम्ही त्यांना दशकानुदशके जी मदत केली, त्याच्या तुलनेत ही फार छोटी मागणी आहे. ग्रीनलँड परत करणे आमचा मूर्खपणा होता." एढेच नाही तर, युरोपीय देशांनीही अनेक भागांवर कब्जा मिळवला आहे, त्यात काहीही गैर नाही, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
Web Summary : Trump clarified his Greenland stance at Davos, denying military force. He emphasized America's protective role and Greenland's strategic importance between major powers. He criticized Europe's economy, contrasting it with US growth.
Web Summary : ट्रम्प ने दावोस में ग्रीनलैंड पर रुख स्पष्ट किया, सैन्य बल से इनकार किया। उन्होंने अमेरिका की सुरक्षात्मक भूमिका और प्रमुख शक्तियों के बीच ग्रीनलैंड के सामरिक महत्व पर जोर दिया। उन्होंने अमेरिकी विकास के विपरीत, यूरोप की अर्थव्यवस्था की आलोचना की।