शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी केला डबा उपडा, माशांसह ट्विटरला मिळालं खाद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:05 IST

टोकियो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. जपान दौ-यात ट्रम्प यांनी एक असा किस्सा केलाय की, त्यामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेत.

टोकियो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. जपान दौ-यात ट्रम्प यांनी एक असा किस्सा केलाय की, त्यामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेत. जपान दौ-यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अकासका पॅलेसमधील तलावाजवळ कोय प्रजातीच्या माशांना खाद्य देण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन व जपानचे पंतप्रधान शिंजो अबेसुद्धा होते.ट्रम्प यांच्याकडे माशांना खाद्य देण्याचा डबा देण्यात आला, त्यावेळी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण डबा तलावात रिकामी केला. दुसरीकडे ट्रम्प माशांना खाद्य देण्यासाठी डबा आपल्याकडे देतील, या प्रतीक्षेत शिंजो अबे होते. या प्रकारानंतर मत्स्यजीव प्रेमींनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. माशांना एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्य दिलं जाऊ शकत नाही. कारण मासे एवढं खाद्य एकदम खाणार नाही. त्यांना थोड्या थोड्या वेळानं खाद्य दिलं पाहिजे, असंही अनेकांचं म्हणणं आहे.विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प माशांना द्यायच्या खाद्याचा डबा तलावात रिकामी करत असताना रेक्स टिलरसन यांना हसू आवरत नव्हते. या प्रकारानंतर डोनाल्ड ट्रम्पसुद्धा ट्विटर ट्रोल झाले आहेत.

काहींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन केलं, तर काही जणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना माशांना खाद्य भरवता येत नसल्याची टीका केली आहे. एका यूझर्सनंही ओबामा यांचा जुना व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवला आहे.या दौ-यात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियावर निशाणा साधला आहे. कोणत्याही हुकूमशाहनं अमेरिकेला कमी समजू नये, असंही ट्रम्प म्हणाले. ते टोकियोमध्ये बोलत होते. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासह सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही कमी ठेवणार नाही. तसेच आम्ही कधीच हिंमत हरणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प