शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जेरुसलेम आता इस्रायलची राजधानी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:58 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या घडामोडींमुळे  मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला आहे.

‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असं आपल्याला ठामपणे वाटतं आणि ती कृती योग्यच ठरेल’, असं डोनाल्ड ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले आहेत.

2016 साली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती आता केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे  मध्यपूर्वेत तसंच जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली आहे. पण, व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असं त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.  डोनाल्ड ट्रम्प याबाबीकडे ‘ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता’ या दृष्टिकोनातून पाहतात, असं एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितलं

घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी दूतावास तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवण्याचा आदेश परराष्ट्र खात्याला देणार आहेत. अमेरिकी काँग्रेसमधील बहुतांश सत्ताधारी व विरोधी सदस्यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे. या निर्णयाला मध्यपूर्वेतील देशांचा विरोध असला, तरी त्यामुळे इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्षांवरील दोन राष्ट्रांच्या तोडग्यावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं.

सौदी अरेबियाचे राजे सलमान व मध्यपूर्वेत अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी मात्र या मुद्दयावर अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं राजे सलमान यांनी म्हटलं आहे; तर यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेला खीळ बसेल असं अल-सिसी यांनी सांगितलं.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायल