शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 15:58 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारतात आयआयटी करून बहुतांश विद्यार्थी अमेरिकेला जातात. उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुण, तरुणी पाहतात. मात्र आता हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच-१बी (H1-B) व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याच्या विचारात आहे. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प एच-१बी व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प सरकारनं अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर केल्यास इतर देशांमधून अमेरिकेत जाऊन, तिथे नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न भंगेल. मात्र सध्या ज्या व्यक्तींकडे अशा प्रकारचा व्हिसा आहे, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना अमेरिकेत नोकरी करता येईल.कोरोनामुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाडइंफोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्या एच-१ बी व्हिसाच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत साईटवर (ऑन-साईट) पाठवतात. ट्रम्प प्रशासनानं एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास याचा फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो व्यक्तींना बसेल. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे आधीच या क्षेत्रातील लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. अमेरिकेच्या नागरिकांना रोजगार देण्याची योजनाएच-१ बी व्हिसा रद्द करण्यामागे दोन प्रमुख कारणं असल्याचं वॉल स्ट्रिट जर्नलनं वृत्तात म्हटलं आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यात परदेशी नागरिकांची भर पडू नये, असा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यांना रोजगार देण्याचा ट्रम्प सरकारचा मानस आहे. त्यामुळे एच-१ बी व्हिसा रद्द करण्याच्या दृष्टीनं ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. लॉकडाऊनच्या काळातील पूर्ण पगार मिळणार का?; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयलॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प