न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के आयात-शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा सोमवारी केली. भारतीय चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार होतात व अमेरिकेतील भारतीय वंशीयांमध्ये लोकप्रिय आहेत. या निर्णयाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा परिणाम होणार आहे.
चित्रपट व्यवसाय इतर देशांनी लुटला
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये लिहिले की, “आपला चित्रपट व्यवसाय इतर देशांनी लुटला आहे. हा प्रकार एखाद्या बाळाकडून साखरगोळी चोरण्यासारखाच आहे.” ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट गव्हर्नर राज्यपाल गॅविन न्यूसम यांना त्यासाठी जबाबदार धरले. ही जुनी समस्या संपवण्यासाठी अमेरिकेबाहेर बनलेल्या प्रत्येक चित्रपटावर १०० टक्के शुल्क लागू केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले.
Web Summary : Donald Trump announced a 100% tariff on foreign films, blaming other countries for exploiting the American film industry. He criticized California's governor and vowed to end this 'theft' by imposing the hefty tax. The decision could significantly impact the Indian film industry.
Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने विदेशी फिल्मों पर 100% टैरिफ लगाने की घोषणा की, और अमेरिकी फिल्म उद्योग के शोषण के लिए अन्य देशों को दोषी ठहराया। उन्होंने कैलिफ़ोर्निया के गवर्नर की आलोचना की और इस 'चोरी' को भारी कर लगाकर समाप्त करने का संकल्प लिया। इस फैसले से भारतीय फिल्म उद्योग पर काफी असर पड़ सकता है।