काबूल : अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांची मदत घेतली आहे.तेथील पोलिसांनी सांगितले की, आरपीजी उद्योगसमुहाच्या केईसी इंटरनॅशनल कंपनीचे हे अभियंते विद्युत उपकेंद्राच्या प्रकल्पावर काम करत होते. या कृत्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. हे अभियंते अफगाणिस्तान सरकारचे कर्मचारी असल्याच्या समजातून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले आहे. या सर्वांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.पाच अधिकारी ठारकंदाहार भागात तालिबान्यांच्या हल्ल्यात पाच पोलिस अधिकारी ठार झाले आहेत. (वृत्तसंस्था)
अपहृत भारतीयांच्या सुटकेसाठी आदिवासी नेत्यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:02 IST