शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

श्वास घ्यायला अडचण होत होती म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे पाहुन डॉक्टर झाले शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:14 IST

एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं, जे अतिशय विचित्र होतं. एका व्यक्तीच्या चक्क नाकामध्ये दात उगवला होता (Tooth Growing in Nose), हे पाहून डॉक्टरही हैराण झाले.

मानवी शरीर अतिशय गुंतागुंतीचं असतं. यात अनेकदा अशा काही अजब गोष्टी आढळतात ज्या त्या ठराविक व्यक्तीसाठी मोठी समस्या बनतात, तर जगासाठी चमत्कार. शरीराबाबत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे समजून घेणं किंवा त्यांचं उत्तर शोधणं कठीण आहे. नुकतंच एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं, जे अतिशय विचित्र होतं. एका व्यक्तीच्या चक्क नाकामध्ये दात उगवला होता (Tooth Growing in Nose), हे पाहून डॉक्टरही हैराण झाले.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये डॉ. सागर खन्ना आणि डॉ. मायकल टर्नर यांनी नुकतंच या केसवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर्नलमधील माहितीनुसार, एका व्यक्तीने क्लिनिकमध्ये सांगितलं की त्याला बऱ्याच काळापासून नाकाने श्वास घेण्यास त्रास होत होता. ३८ वर्षीय या व्यक्तीची टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला deviated septum ची समस्या असल्याचं सांगितलं. सोप्या शब्दात सांगायचं झाल्याचं या व्यक्तीच्या दोन नाकपुड्यांमधील भाग वाकडा होता. यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.

डॉक्टरांनी या व्यक्तीची rhinoscopy केली आणि रिपोर्ट पाहून तेदेखील थक्क झाले. रायनोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात रुग्णाच्या नाकाची तपासणी करण्याकरता त्यात एक ट्यूब टाकली जाते. ट्यूबमध्ये कॅमेरा लावल्यानंतर समजलं की या व्यक्तीच्या नाकाच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचा अवयव वाढत आहे. तपासात समजलं की तो एक अ‍ॅक्टोपिक दात आहे. अ‍ॅक्टोपिक दात म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला दात. ही अतिशय दुर्मिळ स्थिती असते.

जर्नलमध्ये सांगितलं गेलं की दात ओरल आणि ओटोलॅरिनगॉलोगिक सर्जरीच्या माध्यमातून काढण्यात आला (Doctors Removed Tooth from Nose). याची लांबी १४ मिलीमीटर होती. सर्जरीनंतर तीन महिन्यांनी रुग्णाला चेकअपसाठी बोलावलं असता समजलं की त्याची श्वास घेण्यात येणारी समस्याही बंद झाली आहे. रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की अनेकदा दात व्यवस्थित उगवत नाहीत आणि ते जबड्यातच रोवले जातात. त्यामुळे ते वेगळ्याच दिशेने उगवू लागतात आणि याच परिस्थितीत या व्यक्तीप्रमाणे अवस्था होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके