शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

‘खर्‍या’ बातम्यांमुळे पत्रकारांवर हद्दपारीची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:15 IST

देशोदेशीच्या पत्रकारांनी वेळोवेळी अनेकाचं पितळ उघडं पाडलं आहे, अर्थातच त्याची भली मोठी किंमतही पत्रकारांना चुकवावी लागलीे. ‘कोरोना’काळातही तीच परिस्थिती पत्रकारांवर ओढवली आहे.

ठळक मुद्देसरकारचे पितळ उघडे पाडल्यामुळे पत्रकारांना अटक

- लोकमत

कोरोनानं सगळ्यांच्या आयुष्याचीच एकदम उलथापालथ करून टाकली आहे. जगभरातल्या लोकांच्या जगण्यावर जसं अंधारं मळभ दाटून आलं आहे, तसंच त्यांच्या मृत्युनंतरही त्यांना कोणी वाली राहिलेला नाही. कोरोना साथीनं ग्रस्त असलेल्यांच्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रोजच्या रोज गणिती वेगानं वाढते आहे. नेमके किती लोक कोरोनाग्रस्त आहेत, किती मेलेत आणि किती मृत्युशय्येवर आहेत, याचा काही अंदाजच लावता येत नाहीये. चीन, रशिया, त्याचप्रमाणे इतरही काही देशांनी कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दडवली असे उघड आक्षेप आताच जगभर घेतले जाऊ लागले आहेत. रुग्णांना वाचवण्यासाठी जगभरातले डॉक्टर जसे जीवावर उदार होऊन रुग्णसेवा करताहेत, तसेच जगभरातले पत्रकारही आपल्या प्राणांची बाजी लावून कोरोनाबाबतच्या खर्‍या बातम्या जगाला कळाव्यात यासाठी  प्रय}ांची पराकाष्ठा करीत आहेत. देशोदेशीच्या पत्रकारांनी वेळोवेळी अनेकाचं पितळ उघडं पाडलं आहे, अर्थातच त्याची भली मोठी किंमतही पत्रकारांना चुकवावी लागलीे. ‘कोरोना’काळातही तीच परिस्थिती पत्रकारांवर ओढवली आहे.‘कोरोना’बाबतच्या खर्‍या बातम्या दिल्यामुळे आणि सरकारांची बदमाषी उघड केल्यामुळे मोठय़ा संकटांचा सामना त्यांना करावा लागतो आहे. त्यांच्या जीवाला तर धोका आहेच, पण त्या त्या देशांतून हद्दपारीची वेळही त्यांच्यावर आलीय.त्यातलंच एक नाव म्हणजे रुथ मिचेलसन ही इजिप्तची महिला पत्रकार. या परदेशी पत्रकाराला इजिप्त सरकारनं नुकतंच आपल्या देशातून हाकलून दिलं.काही दिवसांपूर्वीच तथ्थ्यांवर आधारित एक न्यूज रिपोर्ट तिनं तयार केला. कोरोनाच्या काळात झालेली विमान उड्डाणं, प्रवाशांचा डेटा, कोरोनबाधितांचा दर, तज्ञांशी, डॉक्टरांशी बोलून केलेली खातरजमा. या सगळ्या माहितीच्या आधारे तिनं दावा केला की, इजिप्त सरकार कोरोनाबाधितांचा जो आकडा सांगतंय, त्यापेक्षा तो कितीतरी जास्त आहे! मार्चच्या पहिल्या आठवड्यात इजिप्त सरकार आपल्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन आहे, असं सांगत असताना प्रत्यक्षात ती किमान सहा हजार ते कमाल 19,310 इतकी होती असा दावा तिनं केला. तिचा हा रिपोर्ट प्रसिद्ध होताक्षणी इजिप्त सरकारनं तिला देश सोडण्याचा हुकुम दिला. तिची माहिती खोटी, अफवा पसरवणारी असल्याचा आरोप ठेवत तिचा व्हिसा रद्द केला. पत्रकार म्हणून तिची मान्यताही रद्द केली. ‘माझा रिपोर्ट सत्य असल्याचा’ तिचा  दावा सिद्ध करण्याची संधीही तिला दिली गेली नाही. ‘सेन्सॉरशिप’च्या नावाखाली स्थानिक मिडीयाचा गळाही इजिप्त सरकारनं कधीच आवळला आहे. पत्रकारांच्या हक्कांचं संरक्षण करणार्‍या समितीचं तर म्हणणं आहे, इजिप्त सरकारनं केवळ गेल्या वर्षातच तब्बल 26 पत्रकारांना तुरुंगात टाकलं आहे. दहशतवाद आणि खोट्या बातम्यांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2014 पासून मिचेल इजिप्तमध्ये राहते आहे. ती मुळची लंडनची. 2010पासून आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीची सुरुवात तिनं र्जमनीत; बर्लिन येथून सुरू केली. त्यानंतर वेस्ट बॅँक, गाझा पट्टी, निर्वासित, सिरीया युद्ध. अशा अनेक ज्वलंत प्रo्नांवर जीन धोक्यात घालून तिनं बातमीदारी केली. अनेकांचं म्हणणं आहे, तिचं नशीब थोर, म्हणून तिला किमान इजिप्तमधून बाहेर तरी पडता आलं. नाहीतर..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या