शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

'टायगर जिंदा है'?; खेळण्यातील वाघामुळे स्कॉटलंड पोलिसांचे झाले हसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 10:41 IST

घटनास्थळी पोलीस आणि श्वानांची विशेष पथकेही पाठवण्यात आली.

एडिनबर्ग: आपल्याकडे अनेकदा सामन्य लोक सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांचा दाखला देतात. मात्र, स्कॉटलंडमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे ही सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. स्कॉटलंडच्या ईशान्येकडील एका शेतात हा सर्व प्रकार घडला. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात एक वाघ बसलेला दिसला. हे बघून शेतकरी प्रचंड घाबरला. त्याने लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. थोड्याचवेळात पोलीस घटनास्थळी हजरही झाले. मात्र, साधारण पाऊण तासानंतर जेव्हा सगळ्याचा उलगडा झाला तेव्हा पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. पोलिसांनी याठिकाणी आल्यानंतर शेतात बसलेल्या वाघाचे फोटो कंट्रोल रूमला पाठवले. तेव्हा एका तज्ज्ञाने हा खरा वाघ असल्याचे सांगितले. त्यामुळे कंट्रोल रूमकडून अनुचित प्रसंग उद्भवल्यास वाघाचा सामना करण्यासाठी घटनास्थळी पोलीस आणि श्वानांची विशेष पथकेही पाठवण्यात आली. यादरम्यान वाघाचे पोट भरल्यामुळे तो बहुधा शांत बसून आहे, फक्त अधूनमधून त्याचे कान हलताना दिसत आहेत, अशी माहिती कंट्रोल रूमला दिली जात होती. मात्र, पाऊणतासाने पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने शेतातील तो वाघ खरा नसून खेळण्यातील असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. तेव्हा सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला. वाघ खरा आहे किंवा नाही हे समजायला पाऊणतास कसा काय लागू शकतो, असे अनेक सवाल नेटिझन्सकडून उपस्थित करण्यात आले. अनेकांनी यावरून पोलिसांची खिल्ली उडवत मजेशीर ट्विटस केली. यानंतर स्कॉटलंडच्या ईशान्य विभागाच्या पोलिसांनी सारवासारव करताना फेसबुकवरून या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. सुमारे 45 मिनिटे हा प्रकार सुरू होता. शेवटी नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. तो वाघ खोटा होता, याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही या सगळ्याकडे सकारात्मक पद्धतीने बघतो, असे पोलिसांनी म्हटले. मात्र, तोपर्यंत पोलिसांची व्हायची ती नाचक्की झालीच होती. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTiger Zinda Haiटायगर जिंदा हैTigerवाघ