पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ते ८ जुलै दरम्यान ब्राझीलमधील रिओ दी जनेरोओ येथे होणाऱ्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या प्रवासापूर्वीच सोमवारी (30 जून 2025) ब्राझीलनेभारताची आकाश एअर डिफेन्स सिस्टिम खरे करण्यास रूची दाखवली आहे. दरम्यान, भारत ब्राझीलसोबत संरक्षण सहकार्यावर चर्चाही करेल, असे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.
जगानं बघितली आकाश एअर डिफेन्स सिस्टिमची ताकद -संपूर्ण जगाने, ऑपरेशन सिंदूरवेळी आकाश एअर डिफेन्स सिस्टिमची ताकद बघितली आहे. तेव्हा पाकिस्तानने चीन आणि तुर्कीच्या ड्रोनच्या सहाय्याने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, मेड इन इंडिया एअर डिफेन्स सिस्टिमने सर्वच्या सर्व ड्रोन आकाशात हाणून पाडले होते.
यासंदर्भात परराष्ट्र सचिव पी कुमारन यांनी पुष्टी केली की, ब्राजील ने केवळ खखरेदीसाठीच रुची दाखवलेली नाही, तर भारतासोबत या सिस्टिमचे उत्पादन करण्याचीही त्यांची इच्छा आहे. ब्राझिल लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी भारतामध्ये आकाश एअर डिफेन्स सिस्टिमचे लाइव्ह प्रदर्शनही बघितले आहे. ते म्हणाले, ब्राझीलला आपल्या संपर्क प्रणाली, गस्त घालणारी जहाजे, स्कॉर्पिन पाणबुड्या, आकाश एअर डिफेन्स सिस्टिम, कोस्टल सर्व्हिलांस सिस्टिम आणि गरुड तोफा यामध्ये रस आहे.
ब्राझीलला संरक्षण साहित्याचा पुरवठा करतोय भारत - भारत आणि ब्राझील G20 उपग्रह मोहिमेत देखील एकत्र काम करत आहेत. MKU आणि SMPP सारख्या भारतीय कंपन्या आधीपासूनच ब्राझीलला बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करत आहेत. तसेच, ब्राझीलच्या दोन मोठ्या कंपन्या टॉरस आर्मास आणि CBC देखील भारतात गुंतवणूक आणि शस्त्रास्त्र निर्मितीत वाढ करत आहे.