शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना होणार तीन वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 10:52 IST

एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे

बीजिंग - एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी कायदा संमत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यानुसार राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी शिन्हुआने दिलं आहे.

सप्टेंबर महिन्यात चीनने आपलं राष्ट्रगीत 'मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स'चा अपमान करणा-यांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यासंबंधीचा कायदा संमत केला होता. हा कायदा चीनव्याप्त हाँगकाँग आणि मकाऊलाही लागू होता. संसदेने यानंतर राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांसाठी गुन्हेगारी कायद्यात काही बदल करुन फौजदारी खटला दाखल करु शकतो का यावर विचार केला. 

सोमवारी सुरु झालेल्या संसदेच्या स्थायी समितीच्या द्वि-मासिक सत्रात कायद्याचा मसुदा मांडण्यात आला. उल्लंघन करणा-यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यासंबंधी मसुद्यात उल्लेख आहे. पण या कायद्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. 

शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रगीताचा वापर फक्त नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या कार्यक्रमांच्या सुरुवातील आणि शेवटी केला जाऊ शकतो. याशिवाय अधिकृत राजकीय सभा तसंच राजकीय कार्यक्रमांसहित मोठ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वापरलं जाण्याची परवानगी असणार आहे. महत्वाचं म्हणजे खासगी कार्यक्रमांमध्ये, जाहिराती आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीताचा वापर करणं कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायदा समंत झाल्यास नियमाचं उल्लंघन करणा-यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

चीनने राष्ट्रगीताचा वापर करण्यावरुन 2014 मध्येही नियम केले होते. नियमाअंतर्गत लग्न, अंत्यसंस्कार आणि मनोरंजन तसंच खासगी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचा वापर केला जाऊ शकत नाही.  

टॅग्स :chinaचीनNational Anthemराष्ट्रगीत