शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:46 IST

एका घराला नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत घरमालकिणीसह तीन किशोरवयीन भारतीय भावंडे होरपळून मरण पावली

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील कॉलिएरव्हिले गावातील एका घराला नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत घरमालकिणीसह तीन किशोरवयीन भारतीय भावंडे होरपळून मरण पावली.गावातील बायबल चर्चने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ही आग गावातील क्वाड्रिएट कुटुंबाच्या घराला २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास लागली. अग्निशमन कर्मचारी येण्याआधीच शेजाऱ्यांनी सुमारे अर्धा तासात आग विझविली; पण तोपर्यंत ते संपूर्ण लाकडाचे असलेले घर जळून खाक झाले. चर्चने मृतांची नावे अशी दिली : श्रीमती कॅरी क्वाड्रिएट (५५ वर्षे), शेरॉन नाईक (१७), जॉय नाईक (१५) आणि अ‍ॅरॉन नाईक (१४).घरमालक डॅनी क्वाड्रिएट व त्यांचा ११ वर्षांचा मुलगा कोल हे पेटत्या घराच्या खिडक्यांमधून उड्या टाकून बाहेर पडल्याने सुदैवाने वाचले. दोघेही गंभीर भाजले होते; पण आता त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.डॅनी व कॅरी क्वाड्रिएट कॉलिएरव्हिले बायबल चर्चचे संचालन करीत व चर्चच्या जवळच त्यांचे घर होते.स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आग कशी लागली व चौघांचा मृत्यू होईपर्यंत कोणाला कळले कसे नाही, हे स्पष्ट झालेले नाही. नंतर अग्निशमन अधिकाºयांनी तपासणी केली असता घरातील आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बंद पडली अस्लयाचे आढळून आले. (वृत्तसंस्था)अभागी दाम्पत्य तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातीलआगीत दुर्दैवी मृत्यू झालेली तिन्ही भावंडे श्रीनिवास आणि सुजाता नाईक या भारतीय दाम्पत्याची मुले आहेत. हे दाम्पत्य भारतात तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील गुरुपुथंडा गावातील आहे. बायबल चर्चच्या आर्थिक मदतीने नाईक दाम्पत्य ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करतात. तिन्ही मुलांच्या मृत्यूचे वृत्त कळताच ते तातडीने अमेरिकेला येण्यासाठी रवाना झाले.श्रीनिवास नाईक हे अमेरिकेत पूर्वी चर्चमध्ये पॅस्टर म्हणून काम करायचे. गेल्या वर्षीच ते पत्नीसह भारतात परत गेले; मात्र तिन्ही मुले मिसिसिपी राज्यातील फ्रेंच कॅम्प अकादमीमध्ये शिकत असल्याने ते त्यांना अमेरिकेतच ठेवून गेले होते.ही तिन्ही भावंडे नाताळ साजरा करण्यासाठी कॉलिएरव्हिले येथे क्वाड्रिएट कुटुंबाकडे पाहुणे म्हणून राहायला आली होती. दुर्दैवाने तेथेच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारत