शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:56 IST

यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे...

चीन बऱ्याच काळापासून समुद्रात वर्चस्व गाजवत आला आहे. त्याने आता त्याच्या तीन युद्धनौका समुद्रात फिरण्यासाठी पाठवल्या आहेत. चीनच्या या कृत्यामुळे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघेही सतर्क झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आपल्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात दिसून आलेल्या चिनी नौदलाच्या तीन युद्धनौकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे. 

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या मुख्यभूमी किनाऱ्याजवळ एक फ्रिगेट, एक क्रूझर आणि एक पुरवठा टँकर आढळून आले होते. ही युद्धनौका आता ऑस्ट्रेलिया पूर्वेकडील किनाऱ्याजवळून खाली जात आहे. तसेच, माध्यमांतील वृत्तांनुसार, ही युद्धनौका सिडनीपासून 150 समुद्री मैल (278 किमी) पूर्वेत आहे.

"प्रत्येक हालचालीवर नजर" -यासंदर्भात, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस म्हणाले, "आम्ही त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आमचे लक्ष आहे. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्या कारवाया सुरू आहेत. ज्याप्रमाणे त्यांना आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात राहण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही सतर्क राहण्याचा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे."

न्यूझीलंड देखील लक्ष ठेऊन -   न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स म्हणाल्या, आपले संरक्षण सैन्य या जहाजांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी सांगितले की, हा नौदल टास्क ग्रुप आमच्या भागात का तैनात करण्यात आला आणि पुढे त्याचा प्लॅन काय, यासंदर्भात चीन सरकारने कुठलीही माहिती आम्हाला दिलेली नाही.

चीन-ऑस्ट्रेलिया यांच्यात आकाशातही तणाव -तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात, एका चिनी लढाऊ विमानाने दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियन लष्करी विमानाजवळ फ्लेअर्स टाकले होते. याला ऑस्ट्रेलियाने "असुरक्षित लष्करी क्रियाकलाप" म्हणून संबोधले होते. यानंतर, ऑस्ट्रेलियन विमानच "चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत होते आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत होते," असा आरोप चीनने केला होता.

टॅग्स :chinaचीनAustraliaआॅस्ट्रेलियाNew Zealandन्यूझीलंड