शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाजं बुडाली, 31 जणांचा मृत्यू, 62 लोकांचे बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 09:24 IST

फिलिपिन्समध्ये समुद्रानं धारण केलेलं रौद्ररूप आणि अजस्त्र लाटांनी तीन जहाजं बुडाली आहेत.

मनिलाः फिलिपिन्समध्ये समुद्रानं धारण केलेलं रौद्ररूप आणि अजस्त्र लाटांनी तीन जहाजं बुडाली आहेत. या दुर्घटनेत तिन्ही जहाजांवरच्या जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बेपत्ता आहे. कोस्ट गार्डचे प्रवक्ते अरमंड बालिलो यांच्या मते या जहाजांमध्ये जास्त करून गुइमारस आणि इलोइलो प्रांतातील लोक होते. हवामानाची स्थिती चांगली नसल्यानं ही जहाजं बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.62 प्रवासी आणि क्रू मेंबर्सला सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. बुडत्या तिसऱ्या जहाजात कोणताही प्रवासी नव्हता. त्यात असलेल्या पाच क्रू मेंबर्सला बचावण्यात आलं आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला अन् जहाज हेलकावे खाऊ लागले. त्यानंतर एक मोठी लाट आली आणि जहाजचं उलटले, असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. तर दोन जहाजांची दुर्घटना झाल्यानंतरही तिसऱ्या जहाजाला पाण्यात उतरण्याची कशी काय परवानगी मिळाली, याबाबत अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हवामान खराब असल्यावर जहाजांना समुद्रात उतरण्याची परवानगी देण्यात येत नाही. हवामान खात्यानं सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचीही माहिती दिली होती.