शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमधल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी घेतला बांगलादेशचा आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:57 IST

राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे. गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं.

ठळक मुद्देबौद्ध देश असलेल्या म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्य मुस्लीम अल्पसंख्याकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती होती.लष्करानंही रोहिंग्य बंडखोरांच्या विरोधात बळाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे रोहिंग्य मुस्लीमांना मुस्लीम बहुसंख्य असलेला बांगलादेशही जवळ करण्यास उत्सुक नाहीये

ढाका, दि. 23 - राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे. गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं. बंडखोरांनी पोलीसांवर हल्ला करण्याचे प्रकारही वाढले होते. त्यानंतर लष्करानं बळाचा वापर केला होता. याचं वर्णन करताना संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्यांचं वंशविच्छेदन होत असल्याची भीती व्यक्त केली होती. मुख्यत: बौद्ध देश असलेल्या म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम अल्पसंख्याकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती होती.बौद्ध आणि स्वत:ला अनेक दशकांपासून राहत असल्याने स्थानिक म्हणवणारे रोहिंग्या यांच्यामध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले होते. विशेष म्हणजे म्यानमारचे सरकार बौद्ध नेत्यांच्या बाजुचे असल्याचे दिसून आले असून लष्करानंही रोहिंग्या बंडखोरांच्या विरोधात बळाचे हत्यार उपसले. राखिन प्रांतात म्यानमारच्या लष्करानं केलेल्या कारवाईमुळे हजारोंच्या संख्येने रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतल्याचे रोहिंग्या नेत्यांनी सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.बांगलादेश व म्यानमार या दोन देशांची सीमा निश्चित करणाऱ्या नाफ नदीच्या बांगलादेशातील बाजुला निर्वासितांच्या छावण्या उभारण्यात आल्या असून या छावण्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचे व सर्व यंत्रणांवर ताण पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता बांगलादेशी सीमा सुरक्षा दलाचे जवानही रोहिंग्या मुस्लीमांना मज्जाव करत असल्याचे चित्र आहे. याच आठवड्यात 31 जणांना घेऊन येत असलेली बोट बांगलादेशच्या जवानांनी परत पाठवली.गेल्या काही दिवसांमध्ये 700 कुटुंबांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचे कमाल होसेन या रोहिंग्या नेत्याने सांगितले. राखिनमधल्या आमच्या घरावर स्थानिक बौद्धांनी हल्ला केल्यामुळे आणि आमची घरं लुटल्यामुळे आपण 40 नातेवाईकांसह बांगलादेशात आल्याचे मोहम्मद उमर या तरूणाने सांगितले.राखिनमध्ये सुमारे 10 लाख रोहिंग्या मुस्लीम राहत असून त्यांना म्यानमारमधील बांगलादेशी घुसखोर म्हणून समजण्यात येते आणि त्यांना नागरिकत्वापासून ते किमान मानवी अधिकारापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी वंचित ठेवण्यात येते.गेल्या  काही वर्षांपासून सुरू झालेल्या या आपत्तीमुळे आत्तापर्यंत सुमारे चार लाख रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचा दावा बांगलादेशातील सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्येच 70 हजार रोहिंग्यांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे रोहिंग्या मुस्लीमांना मुस्लीम बहुसंख्य असलेला बांगलादेशही जवळ करण्यास उत्सुक नाहीये. अमली पदार्थांच्या वाहतुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये रोहिंग्या मुस्लीम असल्याचा आरोप बांगलादेशी पोलीस करत आहेत. लाखाच्या घरातील रोहिंग्या मुस्लीमांचं मुख्य वस्तीपासून लांब पुनवर्सन करण्याचा विचार बांगलादेशी सरकारनं व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Borderसीमारेषा