शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

त्या १0 जणांची फाशी होणार रद्द

By admin | Updated: March 30, 2017 01:43 IST

एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

अबूधाबी : एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी त्यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे. ज्या मुलाची त्यांनी हत्या केली, त्या मुलाच्या वडिलांनी त्या १0 जणांना माफ केलं आहे. तसं त्याने न्यायालयाला कळवलं आहे. एका मोहमद्द फरहान या पाकिस्तानी तरुणाची या १0 जणांनी २0१५ साली हत्या केली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार न्यायालयात अर्ज करून, दोघांच्या सहमतीने प्रकरण मिटवण्याची परवानगी मागितली आहे. शरियत कायद्यानुसार अशी संमती दिली जाते. अर्थात त्यासाठी ब्लडमनी द्यावा लागतो. म्हणजेच या १0 जणांना मोहम्मद फरहानच्या वडिलांना काही ठराविक रक्कम द्यावी लागेल. न्यायालयानेही अर्जाचा सहानुभूतीने विचार करण्याची मान्य केलं आहे. माझा मुलगा आता परत येणार नाही. तसंच या १0 जणांना फाशीची शिक्षा झाल्यास त्यांची कुटुंबंही आर्थिक अडचणीत सापडतील. तसं व्हावं, अशी माझी इच्छा नाही, असं फरहानच्या वडिलांचं म्हणणं आहे. फरहानच्या वडिलांना दोन लाख डिरहाम देऊ न हे प्रकरण मिटवलं जाईल, असा अंदाज आहे. या १0 जणांकडे इतकी रक्कमही नाही. त्यामुळे दुबईत राहणारे भारतीय उद्योगपती एस. पी. सिंग ओबेराय यांची संस्था त्यांना ही रक्कम देणार आहे. हे १0 जण पंजाब व हरयाणा राज्यांतील आहेत.