शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यालाच म्हणतात नशिब; भूकंपातही जगण्याची आशा आहे पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:42 IST

१२९ तासांपासून अडकलेल्यांना जीवदान

अंताक्या (तुर्की) : तुर्कीतील भूकंपानंतर पाच दिवसांपासून म्हणजे १२९ तासांपासून पडलेल्या घरामध्ये अडकलेल्या एका कुटुंबातील पाचजणांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. तुर्की, सीरियातील मृतांची संख्या २५ हजारांच्या जवळ पोहोचली आहे, तर जखमी लोकांची संख्या ८० हजार आहे.  या बचाव पथकाने गाझियानटेप प्रांतातील नुरदाग या शहरातून एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एक महिला आणि तिची मुलगी हव्वा, फातमागुल अस्लान यांना बाहेर काढले. त्यानंतर ही टीम या मुलीचे वडील हसन अस्लान यांच्यापर्यंत पोहोचली. परंतु ते म्हणाले की, माझी दुसरी मुलगी झेनेप आणि मुलगा साल्टिक बुग्रा यांना अगोदर वाचवा. या सर्वांना पथकाने बाहेर काढल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

तुर्कीत अनेक ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत सापडण्याची आशा कमी होत असताना ही घटना अपेक्षा उंचावणारी आहे. 

तुर्कस्तानच्या भूकंपात एका भारतीयाचा मृत्यू

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर बेपत्ता असलेला विजयकुमार गौड याचा मृतदेह शोधपथकाला सापडला आहे. तो ज्या हॉटेलमध्ये राहत होता, ती इमारत भूकंपामुळे कोसळली हाेती. विजयकुमारचा चेहरा विद्रूप झाला असून त्यामुळे हातावरील ओम या अक्षराच्या टॅटूवरून त्याची ओळख पटविण्यात आली. तो उत्तराखंडमधील मूळ रहिवासी असून, बंगळुरूच्या एका कंपनीत तो नोकरी करत होता. कंपनीच्या कामासाठी तो तुर्कस्तानला आला होता. 

टॅग्स :Earthquakeभूकंप