शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शत्रू पाताळात का असेना, शोधून काढतं हे ड्रोन; बिळात लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांसाठी बनलंय कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 16:45 IST

इस्रायल 1998 पासून हर्मेस 450 ड्रोनचा वापर करतो.

इस्रायल आणि हमास युद्धाला एक महिना उटून गेला आहे. इस्रायल हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई आणि जमिनी हल्ले करत आहे. या युद्धात इस्रयल एका खास ड्रोनचा वापर करत आहे. खरे तर, हमासचे दहशतवादी ड्रोन्स अथवा छोट्या रॉकेट्सने हल्ला करून बोगद्यांमध्ये लपून बसतात. मात्र, असे बोगदे शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी इस्रायल ज्या ड्रोनचा वापर करत आहे, ते एक जबरदस्त गुप्तहेर आहे. एवढेच नाही, तर अचूक हल्ला करण्याचीही त्याची क्षमता आहे. मात्र प्रामुख्याने याचा वापर टेहळणीसाठी केला जातो.

या ड्रोनचे नाव आहे, एलबिट हर्मेस 450 (Elbit Hermes 450) ड्रोन. हे एक मेडियम साइज मल्टी पेलोड अनमॅन्ड एरिअल व्हेइकल आहे. हे केवळ दीर्घकालीन रणनीतिक मोहिमांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, हे ड्रोन एका वेळेला किमान 20 तास उडू शकते.

शत्रू पाताळात का असेने, शोधून काढतं ड्रोन -या ड्रोनमध्ये इलेक्ट्रोऑप्टिकल, इंफ्रारेड सेंसर्स लावण्यात आले आहे. ज्यांच्या सहाय्याने कम्यूनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, सिंथेटिक अपर्चर रडार, ग्राउंड मूव्हिंग टार्गेट इंडीकेशन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अथवा हाइपरस्पेक्ट्रल सेन्सर्सचा वापर केला जातो. हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्याच्या सहाय्याने, शत्रू पाताळात जरी लपलेला असला तरी शोधून काढता येतो.

1998 पासून होतोय वापर -इस्रायल 1998 पासून हर्मेस 450 ड्रोनचा वापर करतो. हे ड्रोन प्रामुख्याने इस्रायली हवाई दलाचा एक भाग आहे. हर्मेसचा वापर ब्राझल, जॉर्जिया, इस्रायल, इंग्लंड आणि अमेरिकेच्या एजन्सिजदेखील करतात. हे ड्रोन 20 फूट लांबीचे आहे. तसेच याचे वजन जवळापास 550 किलो एवढे आहे. महत्वाचे म्हणजे हे ड्रोन जास्तीत जास्त 180 किलो वजनाचे मिसाइल, रॉकेट अथवा बॉम्ब घेऊन उडू शकते. टेहळणीच्या दृष्टीने हे ड्रोन अत्यंत अचून मानले जाते.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्ध