शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:11 IST

Third World War Prediction : जगातील एकूणच परिस्थिती पाहता पुन्हा एकदा महायुद्धाकडे वाटचाल होत आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. 

Third World War Prediction  : गेल्या वर्षभरापासून हमाससोबत संघर्ष सुरू असतानाच गेल्या काही दिवसांत इस्रायलनेइराणचं पाठबळ असलेल्या लेबनॉनमधीस हिजबुल्लाह या संघटनेला लक्ष्य करून तिच्या अनेक बड्या नेत्यांचा खात्मा केला. इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या सोमवारी रात्री इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास, इस्रायल-इराण, लेबनॉन आणि सीरिया हे देश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात युद्धात आहेत. याशिवाय, जगातील ४० हून अधिक इस्लामिक देश इस्रायलच्या विरोधात एकत्र येत असून रशियाही बाहेरून पाठिंबा देत आहे. दुसरीकडे, अमेरिकेसह नाटो समूहातील देश इस्रायलच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. तर उत्तर कोरिया सतत युद्धाची धमकी देत ​आहे आणि अणुचाचणी करत आहे. 

अशातच भारत आणि चीन यांच्यातही सीमा संघर्ष पाहायला मिळतोय. तसेच, चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण, तैवान अमेरिकेला कोणत्याही किंमतीवर वाचवायचे आहे. जगातील एकूणच अशी परिस्थिती पाहता पुन्हा एकदा महायुद्धाकडे वाटचाल होत आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. 

ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील दिग्गज आणि 'भारतीय नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखले जाणारे कुशल कुमार यांनी गेल्या वर्षीच भाकीत केले होते की, २०२४ हे वर्ष जगासाठी या शतकातील सर्वात तणावपूर्ण वर्ष असणार आहे. त्यामुळे जगातील सध्याची परिस्थितीही याच दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडली आणि तिसरे महायुद्ध (Third World War) उभे राहिले तर जगात किती रुपयांचे नुकसान होणार आणि त्याचा सर्वाधिक फटका कोणत्या देशाला सहन करावा लागेल.

किती रुपयांचे होईल नुकसान?सध्या, तिसऱ्या महायुद्धाबाबत केवळ अंदाज बांधले जात आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धात होणाऱ्या नुकसानीचा अचूक अंदाज लावणे शक्य नाही, परंतु विश्लेषक गेल्या महायुद्धात म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात झालेल्या नुकसानीच्या आधारे भविष्यातील नुकसानीचा अंदाज लावत आहेत. १९३९ ते १९४५ या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाचे इतिहासकार डॉ. हेलन फ्राय यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळातील आर्थिक नुकसानाचा आजच्या दृष्टीने अंदाज केला तर जवळपास २१ ट्रिलियन डॉलर्सचे (जवळपास १७६४ लाख कोटी रुपये)  नुकसान झाले. मात्र, तिसऱ्या महायुद्धात यापेक्षा १००० पट अधिक नुकसान होण्याचा अंदाज आहे. हा आकडा बघितला तर एकूण नुकसान जवळपास १७,६३,००० लाख कोटी रुपये इतके असू शकते.

आधुनिक शस्त्रे विकसित सध्या अनेक देशांकडे आधुनिक शस्त्रे आहेत. युद्ध झाले तर ते जमीन, पाणी आणि आकाश तसेच सायबरच्या माध्यमातून लढले जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवितहानीबरोबरच मोठी वित्तहानी होण्याचीही शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धात जिथे फक्त अमेरिकेकडे अणुशक्ती होती, आज जगातील डझनभर देशांकडे अणुबॉम्ब आहेत. एवढेच नाही तर हायड्रोजन बॉम्ब आणि रासायनिक शस्त्रेही विकसित केली आहेत. त्यामुळे महायुद्ध झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा अंदाज तुम्ही स्वत: लावू शकता.

कोणाचे होणार जास्त नुकसान?दुसऱ्या महायुद्धाबद्दल बोलायचे झाले तर युरोपीय देशांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. तिसरे महायुद्ध झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका आणि रशियावर होणार हे उघड आहे. याचे कारण या दोन देशांनी इतर देशांना एकमेकांच्या विरोधात एकत्र केले आहे. युद्ध झाल्यास या दोन्ही देशांना केवळ आर्थिक मदतच करावी लागणार नाही, तर मित्र राष्ट्रांना शस्त्रेही द्यावी लागतील, हे उघड आहे. युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची थेट मदत तर दिलीच, पण अनेक शस्त्रेही पाठवली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIsraelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाchinaचीनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाnorth koreaउत्तर कोरिया