शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वीडनची राजरत्ने चोरुन, स्पीडबोटीने चोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 12:32 IST

लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली

स्टॉकहोम- जगभरातील बहुतांश राजघराणी आता केवळ समारंभासाठी आणि केवळ दिखाऊ कार्यक्रमांपुरते उरले असले तरी त्यांच्याबाबत आजही लोकांमध्ये चर्चा होत असते. राजघराण्यांमधील विवाह, तंटे याबाबत आजही लोकांना उत्सुकता असते. स्वीडिश राजघराणेही युरोपिय नागरिकांचे लक्ष वेधून घेत असते. त्यातच आता राजचिन्हांच्या चोरीने भर घातली आहे.स्वीडिश राजघराण्याची राजचिन्हे व राजरत्ने चोरीला गेली आहेत. मंगळवारी दुपारी दोन चोरांनी स्टॉकहोममधील एका कॅथिड्रलमध्ये मांडलेल्या राजचिन्हांची चोरी केली. लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र या चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली. हा तलावाचा प्रदेश 74 मैलांचा असून त्यामध्ये अनेक बेटे आहेत. तरिही चोरांनी धाडस करून थेट राजघराण्याच्या वस्तूंवर आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

चोरांनी राजरत्नांना हात लावताच धोक्याची सूतना देणारी घंटा वाचू लागली मात्र तरिही ती पळविण्यात चोरांना यश आले. या राजचिन्हांचा विमा उतरवला गेला असला तरी त्यांच्या ऐतिहासिक व भावनिक मूल्याची भरपाई करणे अशक्य आहे त्यामुळेच स्वीडिश अधिकारी त्याबाबत चिंतेत आहेत. कॅथिड्रलचा प्रवक्ता याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाला, त्या राजचिन्हांचे आर्थिक मूल्य करणे शक्य नाही कारण त्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने अमूल्य वस्तू होत्या. राजचिन्हांची चोरी करुन दोन चोरांनी वेगाने दुचाक्या चालवत स्पीडबोटीपर्यंत जाऊन स्पीडबोटीत उड्याच मारल्या व ते तात्काळ निघून गेले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.हा सर्व प्रकार पाहताना प्रत्यक्षदर्शी अक्षरशः थिजून गेले होते. त्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने तपास सुरु करण्यात आला मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

टॅग्स :Thiefचोर