शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उभी रात्र त्यांनी थंडीत कुडकुडत घालवली, नेपाळमध्ये हजारो बेघर; मृत्यूसंख्या १५७ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 07:20 IST

रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.  

काठमांडू : शनिवारी रात्री कडाक्याची थंडी असूनही नेपाळच्या वायव्य भागातील डोंगराळ गावांमधील हजारो लोकांना भूकंपामुळे बाहेर रस्त्यावर कुडकुडत झोपावे लागले. नेपाळमधीलभूकंपात किमान १५७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या संख्येने घरांचे नुकसान झाले.

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या भूकंपामुळे हजारो घरांचे नुकसान झाले आहे. चिउरी गावातील रहिवासी लाल बहादूर बिका यांनी भूकंपात ठार झालेल्या १३ लोकांच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहांकडे बोट दाखवत सांगितले, आम्ही आमच्या गावांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची वाट पाहत आहोत आणि जखमी लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.  सरकारने मदतीसाठी तंबू, अन्न आणि औषधे पाठविली आहेत.

माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गेले...- रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी बिमल कुमार कार्की म्हणाले की, मी गाढ झोपेत होतो तेव्हा अचानक सर्व काही भयानकपणे थरथर कापू लागले. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण माझे संपूर्ण घर कोसळले. - मी पळण्याचा प्रयत्न केला; पण माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कार्की म्हणाले की, मी ओरडलो, पण माझे शेजारी घरांमध्येही सारखीच स्थिती होती आणि मदतीसाठी लोक ओरडत होते. बचाव कर्मचाऱ्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला अर्धा ते एक तास लागला.

टॅग्स :NepalनेपाळEarthquakeभूकंप