शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 18:09 IST

डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्याच देशाच्या कायद्यांबद्दल आणि स्थलांतरितांवर राग व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन- स्थलांतर करुन अमेरिकेत येणाऱ्या लोकांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प नेहमीच दुस्वास करतात हे आता लपून राहिलेले नाही. सत्तेत येताच त्यांनी सहा देशातल्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. सीरिया आणि जगातील इतर प्रश्नांनंतर तसेच मेक्सिकोमार्गे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर सुरुच आहे. ट्रम्प यांनी या स्थलांतरितांबद्दल नेहमीच असहिष्णू भाव दाखवत त्यांना कडाडून विरोध केला आहे. आता तर या लोकांची त्यांना जनावरं म्हणून संभावना केली आहे.अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे कठोर नाहीत असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणावर कडाडून टीका केली आहे. हे कायदे मूर्खपणाचे आहेत असे सांगत केवळ मेरिटच्या जोरावरच लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळाला पाहिजे असा शब्दांमध्ये त्यांनी आपला राग व्यक्त केला. याबाबत बोलताना ते  पुढे म्हणाले, "आपल्या देशात भरपूर लोक येत आहेत आणखी येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थांबविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्ही कल्पना करु शकणार नाही इतके हे लोक वाईट आहेत. हे लोक नाहीत तर जनावरं आहेत'' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी स्थलांतरितांबद्दल अनुद्गार काढले.या बेकायदेशीर स्थलांतरितांना माघारी पाठविण्याचं प्रमाण आजवर इतकं कधीच नव्हतं. हे सगळं दुबळ्या कायद्यांमुळे होत आहे. ते वेगाने अमेरिकेत येतात, आम्ही त्यांना पकडतो आणि परत पाठवतो. परत ते अमेरिकेत येतात, परत आम्ही त्यांना माघारी पाठवतो हे सगळं विचित्र आहे असे ट्रम्प यांनी मत मांडले. अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवरील बेकायदा स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची ट्रम्प यांनी काँग्रेसला अनेकदा विनंती केली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आधी सांगितल्याप्रमाणे हे कायदे अत्यंत मूर्खपणाचे आहेत. जगातील सर्वात जास्त मूर्ख कायदे आहेत.  आमची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे लोक इथे येतात आणि त्यातल्या प्रत्येकाला या अर्थव्यवस्थेतील वाटा हवा आहे पण त्यामुळे रोजगार मिळणं कठिण होत जातं. त्यामुऴे या देशात लोक केवळ मेरिटच्या जोरावर आले पाहिजेत. मेरिट असणाऱ्या लोकांची आम्हाला गरजच आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिका