शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा धक्का, 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये ब्रेक्झिट करार नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 09:19 IST

ब्रिटिश संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर मतदान झालं.

लंडनः ब्रिटिश संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर मतदान झालं. ज्यात पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला. ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा यांचा 391 विरुद्ध 242 मतांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. जानेवारी महिन्यातही ब्रिटिश संसदेनं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान केलं होतं. त्यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा झटका बसला होता. ब्रेक्झिट कराराविरोधात तब्बल 432 सदस्यांनी मतदान केलं होतं. तर 202 सदस्यांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला होता. त्यामुळे ब्रिटनला युरोपियन युनियनपासून दूर होण्यास आणखी कालावधी लागू शकतो. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी 29 मार्चपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र ब्रेक्झिटबद्दलचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं संमत केलेला नाही. त्यामुळे ब्रेक्झिटला आणखी काही काळ लागू शकतो. यासाठी आता ब्रिटनकडून युरोपियन युनियनकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. संसदेतील मतदानाआधीच पंतप्रधान थेरेसा मे यांना अपयशाची भीती सतावत होती. मे यांच्या पक्षातील अनेकांच्या मनात ब्रेक्झिट कराराबद्दल नाराजी आहे.युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं की नाही, याबद्दल 23 जून 2016 रोजी ब्रिटनमध्ये जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूनं मत नोंदवलं. तेव्हापासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) या संदर्भात मतदान होणार होतं. मात्र पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान मे यांनी मतदान पुढे ढकललं. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांनी पंतप्रधान मे यांना लक्ष्य केलं. खासदारांच्या शंका दूर करण्यात पंतप्रधानांना पूर्णपणे अपयश आल्याची टीका कॉर्बेन यांनी केली होती.  

टॅग्स :Theresa Mayथेरेसा मे