शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

2022 मध्ये एलियन्ससोबत होणार लढाई, अंधारात बुडणार संपूर्ण पृथ्वी...! टाइम ट्रेव्हलर्सचा भयानक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:57 IST

"महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि त्यांचे मानवतेसोबत युद्ध होईल. राक्षसारासखे दिसणारे हे प्राणी 7 फूट उंच आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. 'आपण ज्यांना एलियन म्हणतो, ते 2022 मध्ये पृथ्वीवर दिसतील. याचा अचूक दिवस 24 मे 2022 असू शकतो."

येणारे नवे वर्ष 2022 साठी बाबा वँगापासून ते नॉस्ट्रॅडेमसपर्यंत अनेकांनी वेगवेगळे दावे आणि भविष्यवाणी केली आहे. आता या साखळीत स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवणारे लोकही सामील झाले आहेत. अशा लोकांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्सदेखील आहेत. या टाईम ट्रॅव्हलर्सच्या म्हणण्याप्रमाणे, येणाऱ्या नव्या वर्षात, एलियन्ससोबत युद्ध होऊ शकते आणि समुद्रात बुडलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराचा शोधही लागू शकतो. एका ट्रॅव्हलरने तर, संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडेल आणि इजिप्तचे पिरॅमिड्स हवेत उडतील, असाही दावा केला आहे.

स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या @aesthetictimewarper मे म्हटले आहे, की 2 फेब्रुवारी रोजी अटलांटिक महासागरात अटलांटिस नावाचे शहर शोधले जाईल. याच महिन्यात एक चर्चित व्यक्ती समोर येईल आणि आपण आपल्या मृत्यूसंदर्भात जगाला उल्लू बनवल्याचे स्वतःच कबूल करेल, असेही त्याने म्हटले आहे. याच बरोबर, टिकटॉक वापरकर्ता @futuretimetraveller म्हणाला, वर्ष 2022 मध्ये विविध महान विनाशक घटना घडतील.

एका भीषण ज्‍वालामुखीचा स्‍फोट होईल -या ट्रॅव्हलरने असाही दावा केला आहे, की महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि त्यांचे मानवतेसोबत युद्ध होईल. राक्षसारासखे दिसणारे हे प्राणी 7 फूट उंच आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. 'आपण ज्यांना एलियन म्हणतो, ते 2022 मध्ये पृथ्वीवर दिसतील. याचा अचूक दिवस 24 मे 2022 असू शकतो. आणखी एक कथित टाइम ट्रॅव्हलर @thatonetimetraveler ने म्हटले आहे, की एका मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल.

याशिवाय, अमेरिकेवरील अलकायदाच्या 9/11 च्या हल्ल्याबरोबरच त्सुनामीपर्यंत अचूक भविष्यवाणी करणाऱ्या बुल्‍गेरियाच्या बाबा वेंगानेही, 2022मध्ये एक घातक व्हायरस येईल, एलियन पृथ्वीवर हल्ला करतील. नाकतोड्यांच्या हल्ल्यांमुळे भारतावर उपासमारीची वेळ येईल, असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षJara hatkeजरा हटके