शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

'एअर स्ट्राईकमध्ये एकाही पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू नाही', पाक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 09:42 IST

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. बालाकोटच्या कारवाईत एकाही पाकिस्तानी सैन्याचा किंवा नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केलंय. अहमदाबाद येथे भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना स्वराज यांनी हे बाब स्पष्ट केली. त्यानंतर, पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया देत, अखेर सत्य समोर आलेच, असे म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता. जैश ए मोहम्मदकडून 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आणि स्व-संरक्षणासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्याचं भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. तसेच या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांचा आणि सैन्याचा मृत्यू झाला नसल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर सत्य समोर आलेच, त्याचप्रमाणे 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकचे सत्य समोर येईल. तसेच, पाकिस्तानच्या दोन विमानांना पाडण्यात आल्याचे आणि एफ 16 बाबतही लवकरच सत्य बाहेर येईल, असा खोचक टोला पाकिस्तानने लगावला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य केवळ जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला करणे हेच होते. त्यामुळेच, या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिक ठार मारला जाणार नाही, याची काळजी भारताने घेतली होती. त्यामुळेच जगभरातील देशांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना, देशाला बहुमताच्या सरकारची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक