शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईद 'साहेबां'विरोधात कोणताही गुन्हा नाही, पाकच्या पंतप्रधानांची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:38 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं काल घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही. कोणी तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा होत असल्यानं भारत-पाकमध्ये युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचंही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले होते. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला अद्यापही पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा सिनेट कमिटीच्या बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत बोलले होते. त्यावेळी त्यांनी राजकारण, दहशतवादविरोधी कारवाई आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर भाष्य केले होते. जेव्हा बाजवा यांना देशासाठी संघर्ष करण्यामध्ये हाफिझ सईद याची भूमिका, विशेषकरून काश्मीरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच हाफिझ सईद हासुद्धा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करू शकतो, असे त्यांनी सांगितले होते.काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना आणि भारतविरोधी कारवाया करून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवणाऱ्या लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उल-दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांबरोबर निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले होते. लष्कर आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटना देशभक्त असल्याचा उल्लेखही मुशर्रफ यांनी केला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईदIndiaभारत26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला