शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

...तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानवरून तिळपापड झालेल्या चीनची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 18:49 IST

China threatens India : शांघाय इंस्टिट्यूट्स फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च सेंटर फॉर चायना-साउथ एशिया कोऑपरेशनचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने दावा केला आहे. चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो, असे म्हटले आहे. 

बिजिंग : भारतात तैवानच्या (Taiwan) मुद्द्यावर चर्चा होत असेल तर चे चीनला (china) खपत नाही. चिनी सरकारच्या वृत्तपत्राने एका लेखात भारताला सरळसरळ धमकी दिली आहे. तैवानला समर्थन दिल्यास भारताल नुकसान पोहोचविण्याचे आमच्याकडे अनेक पर्याय असल्याची धमकी तिळपापड झालेल्या चीनने दिला आहे. (India's head is swollen by ego to think it has a ‘Taiwan card’ to play; China Global Times threatens)

शांघाय इंस्टिट्यूट्स फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च सेंटर फॉर चायना-साउथ एशिया कोऑपरेशनचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने दावा केला आहे. चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो, असे म्हटले आहे. 

ग्लोबल टाईम्सनुसार दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारानुसार एकमेकांच्या क्षेत्रिय अखंडतेचा सन्मान करणे लिहिलेले आहे. तैवानला वेगळा देश समजणे हे या करारचे उल्लंघन आहे. अशात नवी दिल्लीला बिजिंगबाबत कोणतेही वक्तव्य करणे टाळायला हवे.लियूने ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले की, आम्ही सिक्किमला भारताचे राज्य नाही असे मानू शकतो. जर भारत चीनमधील विद्रोहींच्या कृत्याचे समर्थन करत असेल तर चीन डोळ्यांच्या बदल्यात डोळा या उक्तीप्रमाणे पूर्वोत्तरेतील भारतद्रोही शक्तींना, फुटीरतावाद्यांना चीन समर्थन देईल. 

तैवानऐवजी कोरोनाची चिंता करावी...भारताने तैवानची नाही तर विक्राळ होत चाललेल्या कोरोना महामारीची चिंता करावी अशा उलट्या बोंबा ग्लोबल टाईम्सने मारल्या आहेत. भारतात जेव्हा अंतर्गत संकटे उद्भवतात तेव्हा तो चीनचे नाव घ्यायला आणि तणाव वाढवायला सुरुवात करतो. कारण लोकांचा लक्ष त्यावरून दुसरीकडे नेता येईल. भारत एक उच्च क्षमतेचा विकासशील देश व्हायला हवा. कोरोना महामारीमध्ये भारत इतर जगापेक्षा जास्त लस बनवत आहे. मात्र, दुर्दैवाने तो दुसऱ्यांच्या विषयात पडून स्वत:चे नुकसान करत आहे, असे म्हटले आहे.  

टॅग्स :chinaचीनsikkimसिक्किम