शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर 20 हजार हत्ती तुमच्या देशात पाठवू! शिकारीवर बंदी घालण्यावरून बोत्सवानाचा जर्मनीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 06:49 IST

Botswana warns Germany: बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठविण्याची धमकी दिली आहे.

गॅबोरोन - बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठविण्याची धमकी दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जर्मनीच्या पर्यावरणमंत्र्यांनी हत्तींच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासाठी बोत्सवानामध्ये हत्तींची शिकार करण्यावर निर्बंध घालायला हवेत, असे त्यांनी म्हटले होते.ते म्हणाले की, “संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे, बोत्सवानामध्ये हत्तींची संख्या सतत वाढत आहे. ते देशातील पिके नष्ट करत आहेत. लहान मुलांना पायदळी तुडवत आहेत आणि मालमत्तेचे नुकसान करत आहेत. यामुळे आफ्रिकन लोक उपाशी मरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिकार करा, मात्र पैसे द्याजगातील एकूण हत्तींपैकी एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. येथे त्यांची संख्या १ लाख ३० हजारांहून अधिक आहे. विशेषतः जर्मनीतील लोक बोत्सवानासारख्या अनेक आफ्रिकन देशांमध्ये हत्तींची शिकार करण्यासाठी जातात. यासाठी येथील सरकार शिकार करणाऱ्यांकडून हजारो डॉलर्स शुल्क आकारते. हा पैसा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी वापरला जातो.  

ब्रिटनलाही दिली होती धमकीब्रिटनमध्ये २०१९ च्या निवडणुकीत हत्तींच्या शिकारीवर बंदी घालण्याचा मुद्दा बनविण्यात आला होता. यावर बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री मथिम्खुलु यांनी ब्रिटनला धमकी देत म्हटले की, आम्ही लंडनमध्ये १० हजार हत्ती पाठवू.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयwildlifeवन्यजीवGermanyजर्मनी