शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

'...तर पुढचा नंबर युरोपचा असेल', हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायली पंतप्रधान थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:20 IST

"विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे."

गेल्या एक महिन्यापासून हमास आणि इस्रायल यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई आणि जमिनीवर हल्ले करत आहे. यातच, ही लढाई सभ्यता आणि निर्देयता यातील आहे. जर मध्यपूर्व दहशतवादाच्या टार्गेटवर आले, तर पुढचा क्रमांक युरोपचा असेल आणि कुणीही सुरक्षित राहणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

हमासने गेल्या 7 ऑक्टोबरला जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 1400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमास समूळ नष्ट होईपर्यंत युद्धाची घोषणा केली. यातच, दहशतवादाची धुरा इराणच्या नेतृत्वाखाली आहे. यात हिजबुल्लाह, हमास, हुथी आदिंचा समावेश असल्याचेही नेतन्याहू यांनी म्हटले आहे. 

ही एक जागतिक लढाई - नेतन्याहू म्हणाले, ही स्थानिक लढाई नाही, तर हे जागतिक युद्ध आहे. या लोकांना पराभूत करणे अत्यंत आवश्यक आहे. हीच लढाई आता आम्ही गाझात हमासविरुद्ध लढत आहोत. विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे.

गाझाचा जगाशी संपर्क तोडला -इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घात हमासचा वरचष्मा असलेल्या उत्तर गाझाचा तेथील अन्य ठिकाणांसोबत असलेला संपर्क तोडला आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू