शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:40 IST

भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

पाकिस्ताना किती कंगाल झाला आहे हे वर्ल्ड बँकेनेच आज जाहीर केले आहे. जग पाकिस्तानला बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देत सुटले आहे, परंतू ते सर्व पैसे पाकिस्तानी लष्कराच्या घशात जात आहेत. या पैशांतून पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांची फौज तयार करत आहे. भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

२०१२ ते २०२२ दरम्यान, भारतातील अति गरिबी २७.१% वरून ५.३% पर्यंत कमी झाली. या काळात २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. पण त्याउलट पाकिस्तानात घडले आहे. पाकिस्तानमधील अति गरिबी ४.९% वरून १६.५% पर्यंत वाढली आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार गरिबी मोजण्यासाठी एक नवीन स्केल निश्चित करण्यात आला आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन $3 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना 'अत्यंत गरीब' मानले जाईल. म्हणजेच जवळपास दिवसाला २५६ भारतीय रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असले तरच तो अति गरीबच्या बाहेर असेल. 

२०२२-२३ मध्ये, भारतात ७.५२ कोटी लोक अत्यंत गरिबीत राहत होते. तर २०११-१२ मध्ये ही संख्या ३४.४४ कोटी एवढी प्रचंड होती. २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ही लोकसंख्या पाकिस्तानी लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. हे पाकिस्तान पूर्णपणे कर्जावर अवलंबून आहे. त्यांची अर्थव्यवस्था एवढी डबघाईला आली आहे की कितीही कर वाढविला तरी या कर्जाचे हप्ते फेडू शकणार नाही. 

एकट्या आयएमएफकडूनच त्यांनी ४४.५७ अब्ज डॉलर्सची २५ बेलआउट पॅकेजेस घेतले आहेत. जागतिक बँक, आशियाई विकास बँक (एडीबी) आणि इस्लामिक विकास बँकेकडून ३८.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे ते वेगळेच. चीनकडून २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर युरोबाँडकडून ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहे. अरब राष्ट्रांनीही पाकिस्तानला कर्जे दिलेली आहेत. यापैकी बरेच देश आणि संस्था हे कर्ज बुडीत खात्यातच मानत आहेत. 

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यानुसार कोणतेही बेलआऊट पॅकेज आले की पाकिस्तानी सैन्य त्यात हस्तक्षेप करून त्याची वाटणी करते. मोठा भाग आपल्याला घेते आणि सरकारला थोडा भाग देते. कर्जातील बहुतांश पैसा हा सैन्यालाच जातो. ते त्याचा वापर दहशतवाद्यांसाठी, सैन्याची शस्त्रे घेण्यासाठी करतात आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडतात. बिसारिया यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँक