शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 07:03 IST

Narendra Modi in G7 Summit: इटलीतील दक्षिणेकडील बारी शहरातील विशाल रिसॉर्ट शहरात सुरू झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना, शांततेचा मार्ग संवाद, मुत्सद्देगिरी यातूनच जातो, असा सल्ला दिला.

बारी (इटली) -  इटलीतील दक्षिणेकडील बारी शहरातील विशाल रिसॉर्ट शहरात सुरू झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि बिट्रनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्यावर चर्चा केली. युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना, शांततेचा मार्ग संवाद, मुत्सद्देगिरी यातूनच जातो, असा सल्ला दिला.

मोदी यांची मॅक्रॉन यांच्यासोबत ही एका वर्षातील चौथी बैठक ठरली. त्यांनी संरक्षण, आण्विक क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गावर चर्चा केली. मोदी यांनी त्यांचे ब्रिटिश समकक्ष ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-ब्रिटन रणनीतीक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

जी-७ शिखर परिषदेच्या कार्यक्रमात जागतिक नेत्यांबरोबर पॅराग्लायडिंग पाहताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह इतर नेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान पोप फ्रान्सिस परिषदेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गळाभेट घेतली.

मेलोनी यांचा 'नमस्ते' व्हिडीओ व्हायरलजी-७ शिखर परिषदेत बहिःस्थ देश म्हणून सहभागी झालेल्या भारताचे पंतप्रधान मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 'नमस्ते' म्हणून स्वागत केले. एवढेच नाही, तर इतर देशांच्या नेत्यांचे भारतीय पद्धतीने स्वागत केले. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

जो बायडेन भरकटले, मेलोनींनी आणले...अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन जी-७ शिखर परिषदेच्या कार्यक्रमात जागतिक नेत्यांबरोबर असताना, भरकटले गेले. काही वेळ ते गोंधळात पडले. ऋषी सुनक, टुडो, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चान्सलर ओलुफ स्कोल्झ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसोबत पॅराग्लायडिंग पाहत होते. बायडेन भरकटून दूर गेले हे लक्षात येताच मेलोनी यांनी त्यांना परत आणले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत