शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 09:38 IST

गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ...

गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही सुकून जाईल अशी उष्णता लोकांना सहन करावी लागत आहे. अनेक शहरांचे तापमान ४८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. यात आता पाकिस्तानातून खळबळजनक बातमी येत आहे. 

भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक असलेल्या मोहेंजोदडोमध्ये सूर्य तापला आहे. मोहेंजोदडोसह दादूमध्ये या सीझनमधील सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे. या ठिकाणी पारा ५० डिग्री सेल्सिअसवर गेला आहे. तर पाकिस्तानातील अन्य शहरांत ४६ डिग्रीवर तापमान नोंद झाले आहे. 

एकीकडे पश्चिम भारतात पावसाने दार ठोठावण्यास सुरुवात केलेली असताना उत्तर भारतात सूर्य आग ओकत आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने ही उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी मोहेंजोदडोतील तापमान ४८ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले होते. 

महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशाराराज्यात एकीकडे वादळी वाऱ्यांचा पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे. तर विदर्भात वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यासह लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या चक्राकार वारे वायव्य इशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रीय आहेत. परिणामी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. २३ ते २६ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विदर्भात तर २३ ते २५ पर्यंत मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. परंतु पाऊस काही पडत नाही. तर कोकणात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कोकणात मान्सूनची चाहूल लागली असून लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानPakistanपाकिस्तान