जगातील सर्वात आलिशान इमारती आणि समुद्रात 'द पाम' सारखे मानवनिर्मित आश्चर्य उभे करणारे दुबईचे प्रभावशाली उद्योगपती सुल्तान अहमद बिन सुलायेम सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीन याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांचा खुलासा झाल्याने सुलायेम यांची ४० वर्षांची प्रतिमा धुळीला मिळाले आहे. या खळबळजनक प्रकरणानंतर त्यांना जगातील सर्वात मोठ्या पोर्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या 'डीपी वर्ल्ड'च्या ग्रुप चेअरमन आणि सीईओ पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले आहे.
काय आहे 'एपस्टीन फाईल्स'मधील गौप्यस्फोट?
अमेरिकन न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये सुल्तान बिन सुलायेम यांचे नाव तब्बल ९,४०० पेक्षा जास्त वेळा आले आहे. या फाईल्सनुसार, एपस्टीन सुलायेम यांना आपला सर्वात विश्वासू मित्र मानत असे. इतकेच नाही तर दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचा ते उजवा हात असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकन खासदार थॉमस मॅसी आणि रो खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ ते २०१८ या काळात सुलायेम आणि एपस्टीन यांच्यात अत्यंत खासगी आणि आक्षेपार्ह ई-मेल्सची देवाणघेवाण झाली होती.
टोक्योमधील 'ती' सहल आणि टॉर्चर व्हिडिओ
या फाईल्समध्ये सुलायेम यांनी एपस्टीनला पाठवलेले असे मेसेज सापडले आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या टोक्यो दौऱ्यातील लैंगिक मालिश आणि इतर वैयक्तिक क्षणांची माहिती दिली होती. याहून धक्कादायक म्हणजे, एका टॉर्चर व्हिडिओशी संबंधित ई-मेलमध्येही सुलायेम यांचे नाव समोर आले आहे. हे ईमेल सार्वजनिक होताच जगभरातून दबाव वाढला आणि अखेर शुक्रवारी त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा निखळला?
सुल्तान बिन सुलायेम हे गेल्या ४ दशकांपासून दुबईच्या आर्थिक प्रगतीचा चेहरा होते. त्यांची कंपनी 'डीपी वर्ल्ड' दुबईच्या जीडीपीमध्ये ३६% आणि युएईच्या जीडीपीमध्ये १२% योगदान देते. दुबईची ओळख असलेल्या 'द पाम' बेटांची निर्मिती करणाऱ्या 'नखील' कंपनीच्या स्थापनेत त्यांची मुख्य भूमिका होती. ते दुबई कार्यकारी परिषद आणि युएई फेडरल टॅक्स अथॉरिटीचे सदस्य होते.
वेबसाईटवरून प्रोफाईल गायब
या कारवाईचे गांभीर्य इतके आहे की, 'डीपी वर्ल्ड'च्या अधिकृत वेबसाईटवरून सुल्तान बिन सुलायेम यांची प्रोफाईल तातडीने हटवण्यात आली आहे. ज्या माणसाने दुबईला जागतिक व्यापाराचे केंद्र बनवण्यात आयुष्य घालवले, त्याचा असा शेवट होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. सध्या दुबईचे बिझनेस जगतात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Web Summary : Sultan Ahmed bin Sulayem, a prominent Dubai businessman, was ousted from DP World after revelations of his ties to Jeffrey Epstein. The 'Epstein Files' revealed extensive communication, leading to his removal and shaking Dubai's economy.
Web Summary : दुबई के प्रमुख व्यवसायी सुल्तान अहमद बिन सुलायेम को जेफरी एपस्टीन से संबंधों के खुलासे के बाद डीपी वर्ल्ड से हटा दिया गया। 'एपस्टीन फाइल्स' में व्यापक संचार का खुलासा हुआ, जिससे उन्हें पद से हटा दिया गया और दुबई की अर्थव्यवस्था हिल गई।