शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बापूंनी दाखवलेला मानवतेचा मार्ग अनुसरला पाहिजे : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:29 IST

रशिया-युक्रेन युद्धावर सामंजस्याने तोडगा काढण्यावर पंतप्रधानांचा भर

कीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनच्या सात तासांच्या दौऱ्यावर शुक्रवारी आगमन झाले. त्यात त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरला. दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून ‘बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी ‘रेल फोर्स वन’ या विशेष रेल्वेने पोलंडहून १० तासांचा प्रवास करून युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले. येथील भारतीय नागरिकांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाचे लक्ष लागलेला रशियाचा दौरा झाल्यानंतर सहा आठवड्यांनी मोदींनी युक्रेनचा हा दौरा केला.

पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांतील युद्धाबाबत चिंता व्यक्त करून शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्याची भारताची अपेक्षा असल्याचे गुरुवारी पोलंड दौऱ्यात म्हटले होते. मोदी यांनी यापूर्वी जूनमध्ये जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीत झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती. 

येथेच झाले होते ‘नाटो नाटो’चे चित्रीकरणपंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांचे निवासस्थान मारिस्की पॅलेस येथे द्विपक्षीय चर्चा केली. याच परिसरात तेलुगू ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘नाटो नाटो’ गाण्याचे चित्रीकरण झाले होते.

दौऱ्याचा मोठा परिणाममोदी यांचा दौरा युद्धग्रस्त युक्रेन आणि रशियामध्ये शांतता आणण्यात नक्कीच मोठी भूमिका बजावेल. त्यांच्या दौऱ्याचा परिणाम दिसेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनी गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी व्यक्त केली आहे. 

६,०३,०१०रशियन सैनिकांनी रशिया-युक्रेन युद्धात आपला जीव गमावला आहे.८,५२२रशियन रणगाडे, १६,५४२ चिलखती वाहने, १७,२१६ तोफखाने, ३६७ विमाने, ३२८ हेलिकॉप्टर्स, २८ जहाजे, १ पाणबुडी नष्ट करण्यात युक्रेनला यश. ४१,००० पॅलेस्टिनी नागरिकांचा युद्धात मृत्यू.९२,७४०पेक्षा अधिक नागरिक युद्धात जखमी झाले आहेत.१६,४००लहान मुलांचा युद्ध सुरू झाल्यापासून मृत्यू झाला आहे.१७,०००पेक्षा अधिक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. या मुलांना अन्नपाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे.

भारत बनला विश्वमित्र...नवी दिल्ली : २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यापैकी अनेक देशांना भारतीय पंतप्रधानांनी दिलेली भेट कित्येक दशकांनंतरची किंवा पहिलीच  भेट ठरली. मोदींच्या दौऱ्यांचा हा आढावा.२०२४    ४५ वर्षांनंतर    पोलंड२०२४    ४१ वर्षांनंतर    ऑस्ट्रिया२०१८    ३० वर्षांनंतर    स्वीडन२०१८    ३० वर्षांनंतर    जॉर्डन२०१६    ३४ वर्षांनंतर    मोझांबिक२०१५    ५० वर्षांनंतर    आयर्लंड२०१५    २८ वर्षांनंतर    श्रीलंका२०१४    ३४ वर्षांनंतर    यूएई२०१४    ३३ वर्षांनंतर    फिजी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया