शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:10 IST

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे. 

चीनमधून आलेल्या कोविड-19 च्या नव्या सब व्हेरिअंटने अमेरिकेत हाहाकार घालायला सुरुवात केल्याचे दिसते. कोरोनामुळे तेथे एका आठवड्यात 350 जणांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त आहे. 'अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात 350 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील बहुतांश लोक उच्च-जोखीम गटातील होते,' असे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेच्या आरोग्य एजन्सीने म्हटले आहे.

अमेरिकेत कोरोनाचा नवा सब व्हेरिअंट -सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचा नवा सब व्हेरिअंट NB.1.8.1 हाहाकार घालताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड सारख्या आशिया खंडातील देशांतही हा नवा सब व्हेरिअंट वेगाने पसरताना दिसत आहे.

अमेरिकेतील एका विमानतळावर परदेशी नागरिकाची तपासणी सुरू असतानाच हा नवा सब व्हेरिअंट आढळून आला होता. आता न्यूयॉर्क, कॅलीफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जीनियासह अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरात हा व्हिरिअंट वेगाने पसरत आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्येही हा व्हायरस पोहोचला आहे.  

महत्वाचे म्हणजे, कोरोना व्हॅक्सीनची कमी होणारी क्षमता, हे देखील कोरोना पसरण्यामागचे एक मुख्य कारण मानले जात आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे. 

एट्रिया रिसर्च इंस्टीट्यूटच्या व्हॅक्सीन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवी व्हॅक्सीन घेणाऱ्यांची संख्या कमी, हे देखील एक कारण आहे. तसेच, व्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतरही, कदाचित आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नव्या विषाणूचा प्रतिकार निर्माण करू शकणार नाही, असेही होऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. वय आणि गंभीर आजार हे देखील मृत्यूचा धोका वाढवणारे एक कारण आहे. तज्ज्ञांनी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सहा महिन्यांच्या अंतराने कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या संसर्गामुळे, अमेरिकेत अँटी व्हायरल पिल molnupiravir, Paxlovid आणि रेमेडिसिविरची विक्री वाढली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाDeathमृत्यू