शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

माऊस विकला गेला दीड कोटी रुपयांत; स्टीव्ह जॉब्स यांना दिली होती प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:20 IST

या माऊसची लिलावातील मूळ किंमत १२ लाख रुपये ठरविण्यात आली होती; पण त्यापेक्षा कित्येक पट अधिक रक्कम विक्रीच्या वेळी मिळाली.

वेलिंग्टन : कॉम्प्युटर, आयफोन यांचा साऱ्या जगात दबदबा निर्माण करणारे ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना प्रेरणा देणारा कॉम्प्युटरचा माऊस एका लिलावात १.४८ कोटी रुपयांना विकला गेला. या माऊसची लिलावातील मूळ किंमत १२ लाख रुपये ठरविण्यात आली होती; पण त्यापेक्षा कित्येक पट अधिक रक्कम विक्रीच्या वेळी मिळाली.

कॉम्प्युटर निर्मितीच्या प्रारंभीच्या दोन दशकांत या उपकरणाबाबत संशोधन होऊन अनेक छोटे-मोठे बदल करण्यात येत होते. याच कालावधीत कॉम्प्युटरचे पहिल्या पिढीतील माऊस व कोडिंग किसेट या गोष्टी डग्लस एंगलबार्ट यांनी बनविल्या होत्या. १९६८ साली या घटना घडल्या होत्या.

३३ हजार पौंडांना खरेदी केले माऊसचे पेटंटॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे १९७८ साली आपले उपकरण अधिक उत्तम बनविण्यासाठी संशोधन करत होते. त्याचवेळी त्यांना एंगलबार्ट यांनी बनविलेल्या माऊसबद्दल माहिती मिळाली. स्टीव्ह जॉब्स यांनी एंगलबार्ट यांच्याकडून त्या माऊसचे पेटंट ३३ हजार पौंडांना खरेदी केले होते. कॉम्प्युटर चालविण्याची प्रणाली अधिक सुलभ होण्यासाठी स्टीव्ह जॉब्स यांनी या माऊसचा वापर केला. 

२.७८  कोटींना विकला कॉम्प्युटरस्टीव्ह जॉब्स यांनी संशोधनासाठी वापरलेली साधने, त्यांनी तयार केलेला ॲपल कंपनीचा पहिला संगणक कालांतराने एका लिलावामध्ये २.९७ कोटी रुपयांना विकला गेला होता. ॲपल-१ नावाचा हा कॉम्प्युटर स्टीव्ह यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने डिझाईन केला होता. त्यांनी बनविलेला पहिला आयफोन लिलावात ४५ लाख रुपयांना विकला गेला. स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेल्या आणखी काही वस्तूंनाही अशीच मोठी रक्कम मिळाली होती.

एंगलबार्ट यांनी तयार केलेल्या माऊसमुळे स्टीव्ह जॉब्स यांना प्रेरणा मिळाली होती. या माऊसला तीन बटणे व एक्स ॲक्सिस व वाय-ॲक्सिसवर धातूच्या दोन डिस्कचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कर्सरच्या स्थितीची नेमकी माहिती मिळत असे. या माऊसच्या नंतरच्या पिढीतल्या माऊसमध्ये नंतर खूप सुधारणा झाल्या. नव्या माऊसमध्ये एका बॉलचा वापर करण्यात आला. आता तर माऊसमध्ये लाईटचा वापर करून कर्सरच्या हालचाली केल्या जातात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान