शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 23:34 IST

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल.

जर आपण दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालो, तर बरेच लोक देश सोडून जातील. आपण जिंकताच मोठा बदल होईल. बरेच लोक देश सोडून पळून जाणार आहेत. कारण, पुन्हा एकदा जिहादी देशांवर बंदी आणली जाईल आणि त्यांच्या प्रवासावरही बंदी घातली जाईल, हे त्यांना समजेल, असे 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीच्या प्रेसिडेंशिअल प्रायमरीमध्ये आघाडीवर असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल. जर आपण अमेरिकेचा द्वेष करत असाल. जर आपण इस्रायलला नष्ट करण्याचा विचार करत असाल, जर आपली सहानुभूती जिहाद्यांसोबत असेल, तर तुम्ही आमच्या देशात घुसू शकणार नाहीत. आम्हाला तुमची आवश्यकता नाही. महत्वाचे म्हणजे, जर ज्यो बायडेन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले, तर आपण देश सोडून जाऊ, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये आक रॅलीदरम्यान म्हटले होते. 

ट्रम्प यांनी 2017 मध्ये केले होते ट्रॅव्हल बॅन -डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 मध्ये ट्रॅव्हल बॅन केले होते. तेव्हा अमेरिकेने लिबिया, इराण, सोमालिया, सीरिया, येमेन आणि अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या सर्व देशांतील लोकांच्या प्रवेसावर बंदी घातली होती. याशिवया, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएलावरही बंदी घालण्यात आली होती. यानंतर, 2020 मध्ये म्यानमार, किर्गिस्तान, नायजेरिया, टांझानिया, सुदानवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र ज्यो बायडेन यांचे सरकार आल्यानंतर, ही प्रवासी बंदी उठवण्यात आली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica ElectionAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनMuslimमुस्लीमIsraelइस्रायल