शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सही करताना पेनमधून गळली शाई, राजे संतापले; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 06:10 IST

अरे देवा, हे (पेन) मला अजिबात नाही आवडत’, असे रागात म्हणत ते खुर्चीवरून उठले.

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर राजे झालेले चार्ल्स (तिसरे) यांची फजिती झाल्याचा आणि त्यानंतर ते संतापल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सही करताना पेनमधून शाई गळाली आणि त्यानंतर त्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अलीकडच्या दिवसांत दुसऱ्यांदा त्यांची चिडचिड कॅमेऱ्यासमोर दिसली. शनिवारी लंडनमध्ये टेबलावर पेनचे फोल्डर बघून चिडलेल्या चार्ल्स यांनी हातवारे करून सहायकाला टेबल साफ करण्यास सांगितले होते.

कुठे घडला प्रसंग? मंगळवारी राजे चार्ल्स उत्तर आयर्लंडमधील बेलफास्टजवळील हिल्सबॉरो कॅसल येथे आले होते. इथे ते व्हिजिटर्स डायरीवर स्वाक्षरी करीत होते. त्या वेळी हा प्रसंग घडला.

काय म्हणाले राजे? ‘अरे देवा, हे (पेन) मला अजिबात नाही आवडत’, असे रागात म्हणत ते खुर्चीवरून उठले. गळके पेन त्यांनी पत्नी कॅमिला यांच्याकडे दिले. यानंतर खिशातून रुमाल काढून बोटे पुसू लागले. ते पाहून ‘बघा ती (शाई) सगळीकडे पसरतेय,’ असे राणी म्हणाल्या. त्यावर, ‘अशा वाह्यात गोष्टी मी सहन करू शकत नाही’ असे राजे जोरात ओरडले आणि निघून गेले. नंतर राणीने स्वाक्षरी केली.

टॅग्स :Queen Elizabeth IIमहाराणी एलिझाबेथ द्वितीय