शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका भूकंपाने सर्व उध्वस्त; घर तुटले, संसार मोडला, माणसंही गेली...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 07:17 IST

भूकंपाला आठवडा उलटल्याने जगण्याची शक्यता कमी, तरीही प्रयत्नांची शर्थ

अंकारा : तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाला आठवडा उलटला असतानाही, बचाव कर्मचाऱ्यांची ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची शर्थ सुरूच आहे. या भूकंपात ३३ हजारांहून अधिक लोक मारले गेले असून, अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याने ते वाचण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे अनेक जण मृतदेहांच्या ढिगाऱ्यात प्रियजनांचा शोध घेत आहेत.

एका व्हिडीओत बचाव कर्मचारी ढिगाऱ्यामध्ये बोगदा करून एकाला बाहेर काढत असल्याचे  दिसते. ही व्यक्ती पाच दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. अशाच प्रकारे अलीकडे दोनजणांचे प्राण वाचविण्यात आले होते. सात वर्षांचा मुस्तफा आणि नफीज इलमाज यांना रविवारी बाहेर काढण्यात आले.

मृतांची संख्या ५० हजारांवर जाण्याची भीतीतुर्की व सीरियातील बचाव कार्यासाठी जगभरातील देश मदत करत आहेत. तुर्कस्तानचे ३२ हजार कर्मचारी  व आंतरराष्ट्रीय पथकांतील ८ हजार २९४ बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत लोकांचा शोध  घेत आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने भूकंपबळींची संख्या ५० हजारांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

तुर्कीतील भूकंपात अनेक इमारती भुईसपाट झाल्या. या महिलेच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता प्रतीक्षा आहे मृतदेह बाहेर काढण्याची. मदत करणारे पथक या ठिकाणी दाखल झाले तेव्हा या महिलेने हंबरडा फोडत आपल्या अश्रुंना वाट करुन दिली. 

तीन देशांची बचाव पथके परतलीसीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशांची बचाव पथके मायदेशी परतत आहेत. रविवारी इस्रायलने सुरक्षेचे कारण सांगून आपले पथक हतझाला ग्रुपला आपत्कालीन विमानाने परत बोलावले. यापूर्वी जर्मनी आणि ऑस्ट्रियानेही तुर्कस्तानातून आपले बचाव कर्मचारी काढून घेतले होते. 

तुर्कस्तानच्या सीमेवर वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसक चकमकी होणार असल्याची माहिती इस्रायलसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे तेथे बचाव कार्यासाठी आलेल्या विविध देशांच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जर्मनीच्या बचाव पथकानेही तेथे गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली.

टॅग्स :EarthquakeभूकंपHomeसुंदर गृहनियोजन