लंडनमधील प्रसिद्ध इस्कॉन गोविंदा प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक प्रकर घडला आहे. या प्रकाराने धार्मिक आणि सामाजिक श्रद्धेलाही धक्का बसला आहे. इस्कॉनच्या या रेस्टॉरंटमधील एक व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक ब्रिटिश आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये KFC चिकन बॉक्स काढून चिकन खाताना दिसत आहे. एवढेच नाही तर, तो तेथील श्रद्धाळूंना आणि कर्मचाऱ्यांना ते देण्याचाही प्रयत्न करत आहे.
संबंधित व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये आला आणि त्याने विचारले, येथे मीट मिळते? मात्र, जेव्हा त्याला सांगण्यात आले की, हॉटेल शुद्ध शाकाहारी आहे, तेव्हा त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट बॅगेतून KFC चा जबा काढला आणि लोकांसमोरच त्यातील चिकन खाऊ लागला. एवढेच नाही, तर हे चिकन त्याने तेथील लोकांना देण्याचाही प्रयत्न केला. यामुळे हॉटेलमध्ये अशांततात निर्माण झाली आणि तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला हॉटेल बाहेर काढले.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया -संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, X वर लोक संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी याला हिंदू मूल्ये आणि संस्कृतीप्रतिचे अज्ञान अथवा जाणूनबुजून केलेला अपमान म्हटले आहे. तर काहींनी याला हिंदूविरोधी किंवा वंशवादी म्हटले. एका युजरने लिहिले, "लोकांना त्रास देऊन त्याला काहीही मिळवले नाही. तो तर केवळ समाजात गोंधळ निर्माण करत आहे." आणखी एकाने लिहिले, "तुम्ही पोलिसांना का बोलावले नाही? जर तुम्ही भित्रे असाल, तर इतरांनी तुमच्यासाठी काही करावे, अशी अपेक्षा करू नका.'