शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा कहर, स्मशानांमध्ये मोठी गर्दी; 24 तास जाळले जातायत मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 17:44 IST

चीनमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरिअंट जेएन.1 चा कहर बघायला मिळत आहे. याशिवाय भारतातही जेएन.1 चे वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे. येथे कोरोना संक्रमण वेगने वाढताना दिसत आहे. परिणामी, होणाऱ्या मृत्यूंमुळे येथील स्मशानांत 24 तास मृतदेह जाळली जात आहेत. येथेही कोरोनाचा नवा सब-व्हेरिअंट जेएन.1 चा कहर बघायला मिळत आहे. याशिवाय भारतातही जेएन.1 चे वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या या व्हेरिअंटमुळे चीनमधील मृतांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. स्मशानांमध्ये पुन्हा एकदा गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने सब-व्हेरिअंट जेएन.1 ला 'व्हेरिअंट ऑफ इंट्रेस्ट'च्या श्रेणीत ठेवले आहे. डब्लूएचओने म्हटले आहे की, गेल्याकाही दिवसांत जगातील काही देशांमध्ये जेएन.1 चे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. 

स्मशानांमध्ये गर्दी वाढली - डेली स्टारने, चीनमधील हेनान प्रांतातील स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोरोमुळे येथील स्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारी स्मशानांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह आले आहेत की, त्यांच्यावर 24 तास अंत्यसंस्कार सुरू आहेत. अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेले मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामुळे अत्यसंस्कारासाठी लोकांना तासंतास वाट बघावी लागत आहे.

अशी आहे भारताची स्थिती -माध्यमांतील वृत्तानुसार, देशात सध्या 1,18,977 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यांपैकी 7,557 गंभीर आहेत. भारतातील कोरोना स्थितीसंदर्भात बोलताना, नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड टास्कफोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले, “काही मृतांची नोंद झाली आहे. मात्र, बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यू