शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे तांडव संपले, जल्लोष सुरू... इस्रायलच्या मंत्रिमंडळाची युद्धबंदीला मंजुरी; आजपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:20 IST

युद्धबंदीची अंमलबजावणी २४ तासांच्या आत म्हणजे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून होणार असल्याची माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली. 

यरुशलम : हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांच्या सुटकेबाबतच्या करारावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. त्यानंतर इस्रालय मंत्रिमंडळाने शनिवारी गाझातील युद्धबंदीच्या कराराला मंजुरी दिली.  त्यामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर कायमचा तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. युद्धबंदीची अंमलबजावणी २४ तासांच्या आत म्हणजे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून होणार असल्याची माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली. 

इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदीच्या कराराची घोषणा बुधवारी अमेरिका व कतारने केली होती. त्यानंतर जगभरातून याचे स्वागत झाले. मात्र, हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांच्या सुटकेबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी स्पष्ट केल्यानंतर नवा पेच निर्माण झाला होता. शनिवारी इस्रायल मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे हा पेच सुटला.

‘ते’ नागरिक जिवंत नसल्याची भीती७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १,२०० नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यानंतर हमासने २५० नागरिकांचे अपहरण केले होते. यापैकी एक तृतीयांश नागरिक जिवंत नसल्याची भीती इस्रायलने व्यक्त केली आहे. त्यामुळे ओलिसांच्या सुटकेबद्दल हमास व इस्रायलमध्ये एकमत झाले असले तरी पहिल्या टप्प्यात कोणत्या ३३ ओलिसांची सुटका केली जाईल, याबद्दल स्पष्टता नाही. या करारांअंतर्गत इस्रायल सरकारदेखील शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. 

७०० पॅलेस्टिनींना सोडणारइस्रायलच्या न्याय मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात सुटका करण्यात येणाऱ्या ७०० पॅलेस्टिनी नागरिकांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेनंतर त्यांच्या सुटकेला सुरुवात होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पॅलेस्टिनी कैद्यांमध्ये तरुण व  महिलांचा समावेश आहे. हमासने ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर हल्ले सुरू केल्यानंतर १५ महिने युद्ध सुरू होते. या युद्धात ४६ हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध