शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 07:51 IST

पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना हा सोन्या-चांदीचा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता.

बांगलादेशातील सतखीरच्या जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा मुकुट चोरीला गेला आहे. हहा मुकुट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला होता. गुरुवारी दुपारी पुजारी पूजा करून बाहेर गेल्यावर ही घटना घडली आहे. पुजारी बाहेर जाण्याची आणि सफाई कर्मचारी आतमध्ये येण्याची वेळ चोरट्यांनी साधल्याने खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रात ही घटना घडली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना हा सोन्या-चांदीचा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता. पुजारी दिलीप मुखर्जी यांनी याची माहिती दिली. दिवसभर पूजा करून ते दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले. यानंतर काही वेळाने स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आले. काही वेळाने त्यांनी देवीकडे पाहिले असता तिच्या डोक्यावरील मुकुट गायब झालेला त्यांना दिसला. मुकुट चांदीचा होता तर त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला होता. 

हे मंदिर हिंदू धर्माच्या ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. श्यामनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर तैजुल इस्लाम यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोराला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंदिराची आख्यायिका...अनारी नावाच्या ब्राम्हणाने १२ व्या शतकात या मंदिराचे निर्माण केले होते. जशोरेश्वरी पीठासाठी त्यांनी १०० दरवाजांचे मंदिर बनविले होते. १३ व्या शतकात लक्ष्मण सेन यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. यानंतर राजा प्रतापादित्य यांनी १६ व्या शतकात या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. या ठिकाणी देवी सतीचे हात आणि पायाचे तळवे पडले होते असे सांगितले जाते. येथे जशोरेश्वरीचा वास आहे आणि भगवान शंकर चंद्राच्या रुपात तिथे प्रकट होतात, अशी मान्यता आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशNavratriनवरात्रीNarendra Modiनरेंद्र मोदी