अमेरिका आणि इस्रयल यांच्यात झालेला युद्धविराम पुन्हा धोक्यात येताना दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका आणि इराण यांच्यातील सीजफायरच्या बातम्यांवरून जबरदस्त संतापले आहेत. यासंदर्भात बोलताना इराणच्या १० सूत्री प्रस्तावासंदर्भातील बातम्या पूर्ण पणे 'फेक न्यूज' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांनी पसरवलेला हा प्रस्ताव पूर्णपणे बनावट असल्याचे म्हणत, त्यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे.
काय म्हणाले ट्रम्प - इराणच्या १० अटींवर युद्धविराम जाहीर करण्यात आला, अशा प्रकारचे वृत्त देण्यात आल्याने अेमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहेत. त्यांनी हे सर्व १० मुद्दे खोटे अणि बनावट असल्याचे म्हटले आहे. एका निवेदनात, ट्रम्प यांनी इराणच्या १० अटींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल आणि चर्चा भरकटवल्याबद्दल माध्यमांनाच जबाबदार धरले. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, "फेल ठरत असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स आणि खोट्या बातम्या देणाऱ्या सीएनएनने इराण चर्चेसंदर्भात एक पूर्णपणे खोटी १०-कलमी योजना सादर केली. ज्याचा उद्देश शांतता प्रक्रियेत सहभागी असलेल्यांना बदनाम करणे आहे. हे सर्व १० मुद्दे पूर्णपणे बनावट, खोटे आणि एक घृणास्पद आहेत! ईव्हिल लूजर्स!!! मेक अमेरिका ग्रेट अगेन."
ट्रम्प पुढे म्हणाले, अमेरिकेचे सर्व सैन्य, विमानवाहू जहाजे, विमाने आणि लष्करी तळ इराणच्या जवळपासच तैनात राहतील. शत्रूचा पूर्णपणे नाश करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
करार नाही तर पुन्हा बॉम्बिंग...! -ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना म्हणाले आहे, "जर कोणत्याही कारणास्तव हा करार अयशस्वी ठरला, तर पुन्हा बॉम्बिंग सुरू होईल. ही लष्करी कारवाई पूर्वीपेक्षा अधिक भीषण आणि प्राणघातक असेल. "इराणकडे कधीही अण्वस्त्रे नसतील आणि 'होर्मुझची समुद्रधुनी' खुला राहील, हे फार आधीच ठरले आहे." या घडामोडींनंतर दोन्ही देशांमधील सीजफायर धोक्यात आले असून, इराणने आधीच 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' पुन्हा बंद केल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे. परिणामी अनेक देशांची शेकडो जहाजे होर्मुझमध्ये अडकली आहेत.