शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

'धन्यवाद भारत', भारताने अब्दुल रौफ अझहरचा खात्मा केला; अमेरिका म्हणाली, "न्याय झाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:46 IST

भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली. कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल रौफ अझहर याला ठार मारले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.  यामध्ये कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल रौफ अझहर याला ठार मारले आहे. भारताच्या या कारवाईचा जागतिक परिणाम आता दिसून येत आहे. अब्दुल अझहरच्या मृत्यूबद्दल अमेरिकेनेही जाहीरपणे भारताचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैशचा मुख्य ऑपरेशनल मास्टरमाइंड आणि मसूद अझहरचा भाऊ अब्दुल अझहरच्या मृत्युमुळे अमेरिका आनंदित दिसत आहे.

अमेरिकेचे माजी राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरूपी प्रतिनिधी झल्मय खलीलजाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले की, "पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताने क्रूर दहशतवादी अब्दुल रौफ अझहरला ठार मारले आहे. हा तोच व्यक्ती आहे, त्याने २००२ मध्ये ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचा शिरच्छेद करून हत्या केली होती. आज न्याय झाला आहे. भारताचे आभार.", असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष

भारताच्या लष्करी कारवाईत मारल्या गेलेल्या अब्दुल रौफच्या मृत्यूला अमेरिकेने 'न्याय मिळाला' असे म्हटले आहे. कुख्यात दहशतवाद्याच्या मृत्यूने अमेरिका तसेच ज्यू समुदाय समाधानी असल्याचे दिसून येते.

अब्दुल अझहरचा डॅनियल पर्लच्या हत्येशी संबंध

२००२ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या एका भयानक हत्येत, वॉल स्ट्रीट जर्नलचे वरिष्ठ पत्रकार डॅनियल पर्ल यांचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जग हादरले. अब्दुल रौफ हा या हत्येचा सूत्रधार होता आणि अमेरिकन एजन्सी बराच काळ त्याचा शोध घेत होत्या.

अमेरिकन महिला राजदूताने पंतप्रधान मोदींना टॅग करुन धन्यवाद म्हटले. अब्दुल रौफ अझहरच्या हत्येवर अमेरिकेचे वरिष्ठ राजनयिक एली कोहानिम यांनीही भारताचे आभार मानले आहेत. पीएमओ इंडियाला टॅग करत त्यांनी लिहिले की, "आम्ही बऱ्याच काळापासून डॅनियल पर्लसाठी न्यायाची वाट पाहत होतो. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मी वैयक्तिकरित्या भारत सरकारची आभारी आहे."

भारताने केलेल्या कारवाईला इस्रायली वृत्तपत्र 'द जेरुसलेम पोस्ट' ने ठळकपणे कव्हर केले होते. भारताच्या या कारवाईमुळे जगभरातील ज्यू समुदायाला दिलासा मिळत आहे. जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध भारताच्या कारवाईला जागतिक पाठिंबा मिळत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndiaभारत