शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:55 IST

Thailand vs Cambodia war: आज पहाटे पुन्हा सीमेवर ऐकू आले तोफांचे आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Thailand vs Cambodia war:थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज संघर्षाचा चौथा दिवस आहे, परंतु दोन्ही देशांच्या सैन्यांमधील चकमकी अद्याप थांबल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धविरामाचे आवाहन करुनही सीमावर्ती भागात जोरदार गोळीबार सुरूच आहे. आज पहाटेपासून सीमेभोवती तोफांचा आवाज ऐकू येऊ लागला, ज्यामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सीमेवर पुन्हा चकमकीएएफपीच्या वृत्तानुसार, रविवारी (२७ जुलै २०२५) पहाटे सीमेवर पुन्हा चकमकी सुरू झाल्या. सीमेपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कंबोडियातील समरोंग शहरातही स्फोटांचे आवाज ऐकू आले. यावरून, दोन्ही देशांच्या सैन्याकडून किती जोरदार गोळीबार केला जात आहे, याचा अंदाज लावता येतो. ही घटना अशा वेळी घडत आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील युद्धविरामासाठीआंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जाताहेत. मात्र, रविवारच्या गोळीबारामुळे हे स्पष्ट झाले आहे की, तणाव अजूनही कायम आहे.

ट्रम्प यांनी केलेला युद्धविरामाचा दावाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला होता की,थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर लवकरच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होऊ शकतो. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले होते की, थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट लवकरच भेटतील आणि युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावले उचलतील. मात्र, त्यांच्या विधानाच्या काही तासांतच सीमेवर पुन्हा गोळीबार सुरू झाला. 

थायलंड आणि कंबोडियामधील वाद काय आहे?थायलंड आणि कंबोडियामधील हा वाद नवीन नाही. दोन्ही देशांदरम्यान एकूण ८१७ किमी लांबीची सीमा आहे, ज्याच्या अनेक भागांवर वाद सुरू आहेत. विशेषतः ११ व्या शतकातील ऐतिहासिक प्रेह विहार मंदिर, ज्याला २००८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले होते, ते वादाचे केंद्र आहे. हे मंदिर डोंगराळ भागात असून, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) हे मंदिर कंबोडियाचा भाग असल्याचे मानले. परंतु थायलंडने हा निर्णय स्वीकारला नाही. तेव्हापासून, हा परिसर दोन्ही देशांमधील तणावाचे कारण बनला आहे.

टॅग्स :Thailandथायलंडwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीयDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प