शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:55 IST

Thai Princess Bajrakitiyabha : 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

थायलंडची राजकुमारी आणि राजा महा वजिरालोंगकोर्न यांची मोठी मुलगी बजरकितियाभा नरेंद्रिरा देव्यावती यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात रॉयल पॅलेसने माहिती दिली आहे. 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रॉयल पॅलेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकुमारी बजरकितियाभा यांची प्रकृती एका विशिष्ट स्तरावर स्थिर झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने बँकॉकला नेण्यात आले. राजकुमारी या राजा वजिरालोंगकोर्न यांच्या तीन अपत्यांपैकी एक आहेत. त्या 1924 च्या पॅलेस लॉ ऑफ सक्सेशननुसार सिंहासनासाठी पात्र आहेत. खाओ याई नॅशनल पार्कमध्ये आपल्या कुत्र्यांसह धावत असताना राजकुमारी बजरकितियाभा यांच्या तोल गेल्याने  खाली पडल्याचे सांगितले जात आहे. 

यादरम्यान त्यांना तासाभराहून अधिक काळ सीपीआर देण्यात आला, पण राजकुमारी बजरकितियाभा यांना फारसा फायदा झाला नाही. तसेच, त्यांना ऑक्सिजन मशीनवर ठेवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी खाओ यईहून बँकॉकला परतताना तीन मोठे लष्करी हेलिकॉप्टरही विलक्षण रात्री उशिरा दिसले. तेथून राजकुमारी बजरकितियाभा यांना ईसीएमओ उपचारासाठी बँकॉक रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शिनीं दोन लष्करी हेलिकॉप्टरसह हॉस्पिटलचे हेलिकॉप्टर पाहिले.

थायलंडमध्ये कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदवी प्राप्त करण्यापूर्वी राजकुमारी बजरकितियाभा यांचे अंशतः शिक्षण ब्रिटनमध्ये झाले होते. नंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली. 2012 मध्ये त्या ऑस्ट्रियामध्ये थायलंडच्या राजदूत होत्या आणि व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी होत्या. तसेच, राजकुमारी बजरकितियाभा यांनी थाई कायदेशीर व्यवस्थेतही पदे भूषवली आहेत.

टॅग्स :Thailandथायलंडhospitalहॉस्पिटलInternationalआंतरराष्ट्रीय