शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:19 IST

मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा या देशांना दिला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

सुरिन : थायलंड व कंबोडिया या देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आले आहे. ट्रम्प यांच्या पुढाकाराने दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. असे असले तरी रविवारीदेखील सीमा भागात चकमकी झडत असल्याने तणाव  कायम होता. 

थायलंड व कंबोडियात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ३३ जण ठार, तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील १ लाख ६८ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची तयारी दाखवल्याची माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियाद्वारे दिली. मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा आपण या देशांना दिला.

त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी वाटाघाटी करण्याची तयारी दाखवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ता. मुएन थोम या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असताना गुरुवारी सीमेलगत झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात थायलंडचे पाच जवान जखमी झाल्यानंतर युद्धाचा भडका उडाला.

कंबोडिया बिनशर्त युद्धबंदीसाठी तयार 

आमचा देश कोणत्याही अटी-शर्तीविना तत्काळ शस्त्रसंधी लागू करण्यास तयार असल्याची माहिती ट्रम्प यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कंबोडियाचे पंतप्रधान हून मानेट यांनी दिली. थायलंडचे प्रभारी पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनीदेखील हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्याचे ट्रम्प यांनी आपल्याला सांगितले. ही दोन्ही देशांच्या सैन्यासाठी व नागरिकांसाठी सकारात्मक बाब असल्याची माहिती पंतप्रधान मानेट यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

दोन्ही देशांनी मलेशियाच्या अध्यक्षांची मध्यस्थ म्हणून भूमिका स्वीकारली आहे; पंतप्रधान हुन मानेट आणि कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई मंगळवारी, २९ जुलैला बैठकीसाठी मलेशियाला जातील. मात्र, थायलंडने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको असल्याची भूमिका घेतली आहे. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाThailandथायलंडwarयुद्ध