शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:04 IST

अमेरिका-चीनचे तणाव निवळल्याचे संकेत

कौलालंपूर : अमेरिकेच्या आर्थिक दबावापुढे नमून रविवारी थायलंड आणि कंबोडियाने युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. असा शांतता करार होऊ शकत नाही असे लोक बोलत होते, पण आम्ही ते करून दाखवले, अशी ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. कंबोडियाच्या पंतप्रधानांनी ही युद्धबंदी ऐतिहासिक असल्याचे म्हटले, तर थायलंडच्या पंतप्रधानांनी या करारामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगितले. यानंतर लगेच कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

अमेरिका-चीनचे तणाव निवळल्याचे संकेत

क्वालालंपूर : आसियान परिषदेच्या निमित्ताने अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफवरूनचा तणाव कमी आल्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी चीनने जगातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत सहमती झाल्याचे संकेत दिले. त्यामुळे डोनाल्ड  ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक सकारात्मक वातावरणात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी चीनने उभय देशांमधील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्राथमिक पातळीवर सहमती दिसून आलेली आहे. 

कौलालंपूर विमानतळावर ट्रम्प यांनी धरला ठेका

ट्रम्प आसियानच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी कौलालंपूर येथे आले असून विमानतळावर त्यांनी स्थानिक कलाकारांसोबत नृत्य केले. आपल्या विशिष्ट ठेक्यात नाचत असताना ट्रम्प यांच्या एका हातात अमेरिकेचा, तर दुसऱ्या हातात मलेशियाचा झेंडा होता.

ट्रम्प यांनी नंतर कम्बोडिया, थायलंड, मलेशियासोबत आर्थिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. चीनवरील अमेरिकेचे अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने महत्त्वाच्या खनिजांसाठी या देशांशी करार केले आहेत. त्यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचीही भेट घेतली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Mediation: Thailand and Cambodia Ceasefire Amid Tariff Threats

Web Summary : Trump brokered a ceasefire between Thailand and Cambodia, citing tariff pressure. US-China tensions ease, and Trump signed economic deals with Southeast Asian nations, aiming to reduce reliance on China. He also met Brazil's president.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन