शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

China Coronavirus: कोरोना व्हायरसवर कॉकटेल लस; 48 तासांत सुधारणा होत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 16:07 IST

एचआयव्ही आणि फ्ल्यूची औषधं वापरुन थायलँडच्या डॉक्टरांनी तयार केली कॉकटेल लस

बँकॉक: कोरोना व्हायरसची लस शोधण्यात यश आल्याचा दावा थायलंडमधल्या डॉक्टरांनी केला आहे. फ्लू आणि एचआयव्हीचं औषध एकत्र करुन कोरोना व्हायरसवर उपचार करणारी लस तयार केल्याचं थायलँडच्या डॉक्टरांनी सांगितलं. काही रुग्णांना नवी लस देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत ४८ तासांमध्ये सुधारणा झाल्याचं डॉक्टर म्हणाले. थायलंडच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे कोरोना व्हायरस नियंत्रणात येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. बँकॉकच्या राजाविथी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी नव्या लसीचा वापर करुन काही रुग्णांवर उपचार केले. यातल्या बहुतांश रुग्णांची प्रकृती सुधारली. यामध्ये वुहानमधल्या एका ७० वर्षीय महिलेचादेखील समावेश आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी संबंधित महिलेला कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. तिच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. 'आम्ही शोधून काढलेली लस म्हणजे उपचार नाही. मात्र त्यामुळे रुग्णांच्या स्थितीत वेगानं सुधारणा होत आहे. गेल्या १० दिवसांपासून आम्ही ही लस वापरत आहोत. काही औषधांचा एकत्रित वापर करुन तयार करण्यात आलेली लस ४८ तासांमध्ये परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे,' अशी माहिती राजाविथी रुग्णालयातले किडनी उपचार तज्ज्ञ डॉ. क्रिएनसाक अतिपॉर्नवानिच यांनी दिली. आम्ही तयार करत असलेली लस उपयोगी ठरत असली तरी याबाबतीत आणखी संधोशक आवश्यक असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे १९ रुग्ण आढळले आहेत. यातल्या आठ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अकरा जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीदेखील एचआयव्ही आणि फ्ल्यूच्या औषधांचा वापर करुन कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरणारी लस शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनमधल्या ९ हजारपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३६१ जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाThailandथायलंडHIV-AIDSएड्स